नवी दिल्ली : कुस्तीपटू सागर धनकरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजयला अटक केली आहे. पंजाबच्या सीमेवर सुशील आणि त्याच्या साथीदाराला अटक झाली.  पोलिसांनी सुशील आणि अजयच्या अटकेसाठी अनुक्रमे एक लाख आणि ५० हजार रुपयांचे इनाम घोषित केले होते.