X
X

Ind vs Pak : कर्णधार विराटने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

READ IN APP

वन-डे क्रिकेटमध्ये ओलांडला ११ हजार धावांचा टप्पा

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वन-डे क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. हा पल्ला गाठण्यासाठी विराटला या सामन्याआधी ५७ धावांची गरज होती, पाकिस्तानविरुद्ध सामन्यात विराटने हा विक्रम अखेरीस आपल्या नावे जमा केला आहे. या खेळीदरम्यान विराट कोहलीने भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.

सर्वात कमी डावांमध्ये ११ हजार धावा करण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. विराटने २२२ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. सचिनला ही कामगिरी करण्यासाठी अधिक डाव लागले होते. ११ वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. वन डे क्रिकेटमध्ये ११००० धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.

दरम्यान रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने हार्दिक पांड्या आणि तळातल्या फलंदाजांना सोबत घेऊन भारताला ३०० धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला.

24
X