X
Advertisement

IPL 2021: CSKच्या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनीवर कारवाई

धोनीवरील कारवाईचं नेमकं कारण काय आहे? जाणून घ्या

दिल्ली कॅपिटल्सकडून चेन्नई सुपर किंग्सनं पराभवाची चव चाखल्यानंतर आता कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर कारवाई करण्यात आली आहे. सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी धोनीविरुद्ध कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. महेंद्रसिंह धोनीला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएल २०२१मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई संघाने दिल्लीसमोर १८९ धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीचा संघ आक्रमकपणे मैदानात उतरला होता. चेन्नईच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई सुरु केली होती. त्यामुळे नेमका कोणत्या गोलंदाजाच्या हाती चेंडू द्यायचा असा प्रश्न चेन्नईचा संघाला पडला असावा. त्यामुळे रणनिती आखताना चेन्नईच्या संघाला निर्धारित वेळेत गोलंदाजी करण्याचं भान राहिलं नाही. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला खेळण्यासाठी ९० मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. या ९० मिनिटांमध्ये अडीच मिनिटांचे दोन टाइम आउट देण्यात आलेत. म्हणजे ८५ मिनिटांमध्ये २० षटकांचा खेळ संपवणं अपेक्षित आहे. अर्थात प्रत्येक तासाला ओव्हर रेट हा १४.१ असा असायला हवा. मात्र या नव्या नियमांचं चेन्नईच्या संघाकडून उल्लंघन झालं. सामन्यात चेन्नईच्या संघाने १८.४ षटकं टाकली आणि दिल्लीच्या संघाने ८ चेंडू राखत १८९ धावांचं लक्ष गाठलं.

IPL 2021: SRH विरुद्ध KKR यांच्यात लढत; कोण मारणार बाजी?

आयपीएल २०२१ स्पर्धेचे आतापर्यंत केवळ दोन सामने झाले आहेत. दिल्लीने पराभूत केल्याने चेन्नईचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर फेकला गेला आहे. तर मुंबई सातव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दूसऱ्या स्थानावर आहे. कोलकाता नाइटराइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद या सामन्यानंतर गुणतालिकेत संघ वरखाली होतील.

23
READ IN APP
X