दिल्लीचा पंजाबवर सात गडी राखून सहज विजय

शिखर धवनच्या नाबाद ६९ धावांच्या खेळीमुळे दिल्ली कॅ पिटल्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिके ट स्पर्धेत पंजाब किं ग्जचे आव्हान सात गडी राखून सहज पार के ले.  दिल्लीने आठ सामन्यांत सहावा विजय प्राप्त करत १२ गुणांसह अग्रस्थान काबीज के ले.

मयांक अगरवालच्या  (नाबाद ९९) आक्रमक फलंदाजीमुळे पंजाबला दिल्लीसमोर विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य ठेवता आले. पृथ्वी शॉ (३९) आणि धवन जोडीने दिल्लीला शानदार सुरुवात करून दिली. त्यांनी ६३ धावांची सलामी दिल्यानंतर धवनने दुसऱ्या बाजूने ४७ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६९ धावा फटकावत दिल्लीला १४ चेंडू राखून विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, पंजाब किंग्जच्या डावात कर्णधार लोकेश राहुल आजारी असल्याने प्रभसिमरन सिंगला या सामन्यात संधी मिळाली. पण तोही (१२) छाप पाडू शकला नाही. स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा (१३) वेगवान गोलंदाज कॅ गिसो रबाडाने त्रिफळा उडवला. पण राहुलच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या अगरवालने अखेपर्यंत किल्ला लढवला. त्याने डेव्हिड मलानच्या (२६) साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ५२ धावांची भर घातली. अगरवालने शेवटपर्यंत फलंदाजी करत ५८ षटकांत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ९९ धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्ज : २० षटकांत ६ बाद १६६ (मयांक अगरवाल नाबाद ९९; कॅगिसो रबाडा ३/३६) पराभूत वि. दिल्ली कॅपिटल्स : १७.४ षटकांत ३ बाद १६७ (शिखर धवन नाबाद ६९, पृथ्वी शॉ ३९; हरप्रीत ब्रार १/१९)