News Flash

Video: खासदारांच्या गोंधळाने बाद झालेल्या सचिनचा फेसबूकवर षटकार

गोंधळी खासदारांना सचिनचं खणखणीत उत्तर

राज्यसभेतलं सचिन तेंडुलकरचं पहिलं भाषण खासदारांच्या गोंधळामुळे रद्द झालं.

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने भल्या-भल्या गोलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी कालचा दिवस काहीसा खडतर गेला. राज्यसभेत खासदार म्हणून ‘राइट टू प्ले’ या विषयावर बोलण्यासाठी उभा राहिलेल्या सचिनला डीएमके खासदारांच्या गोंधळामुळे भाषण करण्याची संधी मिळाली नाही. सभापती व्यंकय्या नायडू यांनी वारंवार विनंती करुनही ‘गोंधळी’ खासदार आपल्या भूमिकेवर ठाम राहत गोंधळ घालत राहिले. अखेर नायडू यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं.

खासदारांच्या गोंधळामुळे आपल्या पहिल्यावहिल्या भाषणाची संधी गमावलेल्या सचिनने मात्र आपला संयम कायम राखत सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. आपल्या फेसबूक पेजवरुन सचिनने राज्यसभेतलं ‘राईट टू प्ले’ विषयावरचं भाषण आपल्या चाहत्यांसमोर मांडलं. खेळ, फिटनेस आणि आरोग्य या गोष्टी भारतीयांसाठी किती महत्वाच्या आहेत यावर सचिनने आपले विचार मांडले. यावेळी सचिनने आपले वडील प्रो. रमेश तेंडुलकर यांची मराठीमधली एक कविताही वाचून दाखवली.

आतापर्यंत सचिन तेंडुलकर राज्यसभेत आपल्या अनुपस्थितीवरुन कायम चर्चेत होता. अनेक खासदारांनी सचिनच्या सतत अनुपस्थित राहण्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र काल टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरुन आलेल्या निकालाने राज्यसभेत खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे सचिनला आपले विचार मांडण्याची संधी मिळाली नाही. मात्र आपले विचार फेसबूकवरुन शेअर करत सचिनने देशवासियांची मन जिंकली आहेत. सचिनच्या या कृतीने काल राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना चांगलीच चपराक बसली असल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2017 4:31 pm

Web Title: denied opportunity to speak in rajya sabha sachin share his right to play speech in facebook slams agitating mp
Next Stories
1 स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क सोडणार नाही, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा बीसीसीआयला इशारा
2 आता लक्ष्य इंदूर
3 नागपाडय़ातील एनबीए संस्कृती
Just Now!
X