News Flash

दिव्या देशमुखला रौप्यपदक

या स्पर्धेचे विजेतेपद कझाकस्तानच्या कामलिनदेनोवा मेरुअर्टने साडे आठ गुणांसह पटकावले.

दिव्या देशमुख

नागपूर : आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने विश्व यूथ बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत रौप्यपदक पटकावले. मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत दिव्याने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात ही कामगिरी के ली. ऑल महाराष्ट्र चेस असोसिएशनच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अकराव्या फे रीत अव्वल मानांकित दिव्याने आठवा गुण नोंदवत उपविजेतेपद निश्चित के ले. के वळ अर्ध्या गुणाने तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली. या स्पर्धेत दिव्याला सुरुवातीच्या काही फे ऱ्यांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तिला गुण नोंदवण्यात अपयश आले. मात्र, अखेरच्या काही फे ऱ्यांमध्ये तिने उत्तम खेळ करत स्पर्धेत दमदार पुनरागमन के ले. या स्पर्धेत दिव्याने रशियाची फिडे मास्टर नॅसरोवा एके तेरिनावर हिचा पराभव के ला. तसेच इतरही काही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटूंविरुद्ध दिव्याने उत्तम कामगिरी केली. या स्पर्धेचे विजेतेपद कझाकस्तानच्या कामलिनदेनोवा मेरुअर्टने साडे आठ गुणांसह पटकावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 3:04 am

Web Title: divya deshmukh won silver medal in the world youth chess tournament zws 70
Next Stories
1 बांगलादेशच्या शकिब अल हसनला मोठा धक्का
2 Video : मॅक्सवेलचा धमाकेदार ‘हेलिकॉप्टर शॉट’ एकदा पहाच..
3 IPL 2020 : ‘मुंबई इंडियन्स’च्या सगळ्यात मोठ्या चाहतीवर CSK फिदा..
Just Now!
X