पहिल्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजीत अपयशी ठरलेल्या कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने ४५ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. पहिल्या दोन सामन्यात कामगिरी खालावल्यामुळे विराटवर टीका होत होती. मात्र मला कोणालाही सिद्ध करुन दाखवण्याची गरज वाटत नाही, असं म्हणत विराटने आपल्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

“मला कोणालाही सिद्ध करुन दाखवायची गरज वाटत नाही. मला फक्त माझ्या संघासाठी खेळत रहायचं आहे. मी माझ्या कामगिरीसाठी खेळत नाही. मी २० धावा केल्या किंवा ५० धावा संघ विजयी होणं हे महत्वाचं आहे. गेली ११ वर्ष मी याच पद्धतीने क्रिकेट खेळतोय आणि माझ्यावर कोणत्याही गोष्टीचा दबाव नाहीये.” सामना संपल्यानंतर विराट कोहली पत्रकारांशी बोलत होता.

विराट कोहली आणि ऋषभ पंतच्या भागीदारीमुळे तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विंडीजवर मात केली. टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ गुरुवारपासून विंडीजविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – ऋषभ पंत भारतीय संघाचं भविष्य, कर्णधार कोहलीकडून कौतुक