News Flash

Sledge Virat Kohli: कोहलीला डिवचू नका, मायकेल हसीची ऑस्ट्रेलियन संघाला ताकीद

कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न चुकीचा

मायकेल हसीने स्मिथला कोहलीपाहून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसी याने भारतीय संघाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला एक सुचना देऊ केली आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ येत्या २३ फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघ कसोटी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असून गेल्या वर्षभरात भारताच्या कसोटी संघाची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. त्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. कोहलीच्या आक्रमकतेने सर्वच प्रभावित झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही कोहलीच्या फलंदाजीचा धसका घेतला आहे. मायकेल हसी यालाही त्याचीच चिंता आहे. त्यामुळे हसीने विराट कोहलीला मैदानात डिवचण्याचा प्रयत्न करून नका, असा सल्ला ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दिला आहे.

 

भारत दौऱयाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात स्टीव्ह स्मिथ याने दिलेल्या मुलाखतीत कोहली मैदानात वैतागलेला आणि रागावलेला पाहायला आम्हाला नक्की आवडेल, असे म्हटले होते. भारतीय फलंदाजांचे लक्ष विचलीत करणे आमच्यासाठी फायदेशीरच ठरेल, असा दावा स्मिथने केला होता. पण भारतीय संघाविरुद्ध खेळविल्या गेलेल्या अनेक चुरशीच्या लढतींचा साक्षीदार असलेल्या मिस्टर क्रिकेटर अर्थात मायकेल हसीने मात्र स्मिथला कोहलीपाहून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. कोहलीला डिवचून त्याच्यावर दबाव निर्माण करण्याची शक्कल हास्यास्पद आहे. कोहली आक्रमक फलंदाज आहे, त्याला आणखी डिवचले तर तो आणखी चांगली कामगिरी करेल, असे हसीने म्हटले. याआधी २०१४-१५ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत कांगारुंनी कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. पण कोहलीने प्रत्युत्तरात मैदानात टीच्चून फलंदाज करत १६९ धावांची खेळी साकारली होती. कोहलीला अशा आव्हानांना सामोरे जाणे जास्त आवडते, त्यामुळे जगातील कोणतेही संघ कोहलीला थांबविण्यासाठी त्याला डिवचण्याचा मार्ग स्विकारणार नाहीत, ते मुर्खपणाचे ठरेल, असेही हसी पुढे म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 4:35 pm

Web Title: dont sledge virat kohli says michael hussey warns australia
Next Stories
1 धोनीचा अनोखा विक्रम…गेल्या ११ वर्षात एकदाही शून्यावर बाद नाही !
2 दुखापतीमुळे साकेतची माघार, वर्धनला संधी
3 सायना, सिंधू यांची माघार
Just Now!
X