News Flash

परदेशी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे खेळ उंचावला -सिंधू

सहारा इंडिया परिवारातर्फे रविवारी मुंबईत एका शानदार कार्यक्रमात पी. व्ही. सिंधूला गौरवण्यात आले.

(संग्रहित छायाचित्र)

भारताची परदेशी प्रशिक्षक किम जि ह्य़ून यांनी सुचवलेल्या बदलांमुळे खेळ उंचावला, असे मत विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने व्यक्त केले. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

‘‘किम यांनी माझ्या खेळाचा अभ्यास करून अनेक बदल सुचवले. पी. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना या बदलांचा माझ्या कौशल्यावर सकारात्मक परिणाम झाला,’’ असे सिंधूने सांगितले. सहारा इंडिया परिवारातर्फे रविवारी मुंबईत एका शानदार कार्यक्रमात तिला गौरवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 1:55 am

Web Title: foreign coachs guidance sparked the game pv sindhu abn 97
Next Stories
1 टेनिसची नवी युवराज्ञी!
2 अमित पांघलवर भारताच्या जागतिक पदकाच्या आशा
3 भारताकडेही ग्रँडस्लॅम विजेते खेळाडू घडवण्याची क्षमता!
Just Now!
X