27 February 2021

News Flash

क्रिकेट मालिका आणि ICC च्या स्पर्धा यांच्यात ‘हा’ फरक – गंभीर

गौतम गंभीरने मुलाखतीत सांगितला विश्वविजेता होण्याचा कानमंत्र

विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडिया गेल्या काही काळात सातत्याने दडपण हाताळण्यात अपयशी ठरत आहे. जोवर भारताला दडपण हाताळण्यात यश मिळत नाही, तोपर्यंत भारताचा क्रिकेट संघ विश्वविजेता म्हणवून घेण्यास पात्र ठरेल, असं मला वाटत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे दडपण हाताळण्याची सवय संघातील खेळाडूंनी द्विपक्षीय मालिका आणि साखळी सामन्यांमध्ये लावून घेतली पाहिजे, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने ‘पीटीआय’शी व्यक्त केले.

“दबावाच्या परिस्थितीत भारतीय संघातील खेळाडूंनी दडपण हाताळण्याची सवय करून घ्यायला हवी. द्विपक्षीय मालिका आणि मोठ्या स्पर्धांमधील साखळी फेरीचे सामने यांचा वापर संघातील खेळाडूनी दडपण हाताळण्याची सवय लावण्यासाठी करून घ्यायला हवा. कारण त्या स्तरावर तुमच्याकडे चूक करण्याची संधी असते. पण बाद फेरीत मात्र तुम्हाला एकमेव संधी असते. त्यात तुम्ही चूक केलीत आणि ती संधी गमावलीत तर तुम्हाला थेट घरी जावं लागतं. या या दोन सामन्यांमधील फरक असतो. त्यामुळे अशा सामन्यांमधून जास्तीत जास्त आत्मविश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जायला हवा”, असे गंभीर म्हणाला.

‘‘जेव्हा निर्णायक लढतींमध्ये चांगली कामगिरी एखाद्याकडून होते तेव्हा तो खेळाडू सर्वोत्तम ठरतो. मात्र सध्या आपण निर्णायक लढतींमध्ये दडपण हाताळण्यात अपयशी ठरत असल्याचे लक्षात येत आहे. विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये साखळी लढतींमध्ये चांगली कामगिरी होते मात्र बाद फेरीसारख्या उपांत्य लढतींमध्ये अपयशी कामगिरी होते. मानसिक दडपण हाताळण्यात आपण कमी पडत आहोत,’’ असे सांगताना गंभीरने २०१९मधील विश्वचषकातील भारताच्या कामगिरीकडे लक्ष वेधले.

भारताने मर्यादित षटकांचा एकदिवसीय विश्वचषक १९८३ आणि २०११ असा दोन वेळा जिंकला आहे. मात्र चार वेळा उपांत्य लढतींत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामध्ये २०१५ आणि २०१९ या दोन मागील विश्वचषकांचा समावेश आहे. ट्वेन्टी-२०मध्ये भारताने २००७मध्ये विश्वचषक जिंकला आहे. ‘‘भारतासारख्या संघाने भरपूर यश मिळवल्याचे आपण म्हणत असतो. विश्वविजेता होण्याची क्षमता भारताने सिद्ध केलेली आहेच. मात्र जोपर्यंत क्रिकेटच्या मैदानात हे सिद्ध करत नाही तोपर्यंत विश्वविजेता संघ अशी ओळख निर्माण होणार नाही,’’ असे गंभीरने सध्याच्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाबाबत म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 6:09 pm

Web Title: gautam gambhir says bilateral series and league stage matches have a chance to make mistake but knockout stage throws you back home vjb 91
Next Stories
1 सुशांतच्या मृत्यूवर शोएब अख्तर म्हणतो…
2 हे U-19 नाहीये, मार ना ! जेव्हा हार्दिक पांड्या शुभमन गिलला स्लेजिंग करतो
3 माझ्यासोबत जे झालं, ते इतरांच्या बाबतीत नको – हरभजन
Just Now!
X