अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल यंदा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाशी जोडला गेल्याबद्दल आनंदी आहे. आजपासून आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होत आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मॅक्सवेलने आपल्या भावना व्यक्त केल्या.

glenn maxwell
ग्लेन मॅक्सवेल

 

मॅक्सवेल म्हणाला, “आरसीबी संघात सामील होणे आनंददायी आहे. मला वाटते, की मी संघात उर्जा भरू शकेन. मी ज्या संघासाठी खेळलो आहे, त्या संघासाठी मी सर्व काही दिले आहे. मला कोहली आणि डिव्हिलियर्सकडून नेहमी शिकण्याची इच्छा होती. हे दोन खेळाडू टी-20 मध्येच नव्हे, तर जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहेत. मी या मोसमात खूप उत्साही आहे.”

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनीही मॅक्सवेलच्या समावेशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कोहली म्हणाला, “आमच्या संघात मॅक्सवेल असल्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत.” तर, डिव्हिलियर्स म्हणाला, “मॅक्सवेलसारखा खेळाडू संघात असणे हे खरोखर रोमांचक आहे.”

राहुल द्रविडचं हे रुप कधी पाहिलेलं नाही; विराटचं ट्वीट चर्चेत

यंदाच्या लिलावात आरसीबीने 35.40 कोटी पैकी 34 कोटी तीन अष्टपैलू खेळाडूंवर खर्च केले. त्यांनी न्यूझीलंडच्या काईल जेमीसनला 15 कोटी, ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला 14.25 आणि ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल ख्रिश्चनला 4.8 कोटींची बोली लावत संघात घेतले.