News Flash

Ind vs Eng : …तर अँडरसनला कोणीही रोखू शकत नाही – ग्लेन मॅग्रा

सध्या सुरू असलेल्या मालिकेत अँडरसनने ९ गडी बाद केले आहेत.

ग्लेन मॅग्रा

Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत सध्या भारत २-१ने पिछाडीवर असून या मालिकेतील २ सामने अद्याप शिल्लक आहेत. त्यामुळे हे दोन सामने जिंकून भारत मालिका जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पण भारतीय फलंदाजांपुढे इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचे कडवे आव्हान असणार आहे. त्यातच इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी बळी टिपणारा गोलंदाज जेम्स अँडरसन याच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

अँडरसनला कसोटी इतिहासातील सर्वाधिक बळी टिपणारा वेगवान गोलंदाज बनण्यासाठी केवळ ७ गड्यांची आवश्यकता आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅग्रा हा ५६३ बळींसह या यादीत अव्वल आहे. मात्र त्याने निवृत्ती स्वीकारल्यामुळे आता त्याच्या या विक्रमाला धक्का लागण्याची शक्यता आहे. पण या संबंधी वाईट न वाटून घेता मॅग्राने अँडरसनबाबत एक मोठे विधान केले आहे. अँडरसन हा आपला विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे जर अँडरसनने आपला विक्रम मोडला, तर त्याला कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास मॅग्राने व्यक्त केला आहे.

मला अँडरसनबद्दल आदर आहे. त्याने माझा विक्रम मोडला तर त्याला कोणीही रोखू शकणार नाही. मी या यादीत अव्वल आहे. इतर कोणत्याही वेगवान गोलंदाजांपेक्षा मी अधिक बळी टिपले आहेत. पण अँडरसनने माझा विक्रम मोडला, तर मला आनंदच होईल, असेही तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 8:49 pm

Web Title: glenn mcgrath says james anderson is unstoppable with surpassed his record of most wickets by fast bowler in test cricket history
टॅग : James Anderson
Next Stories
1 Asian Games 2018 : नीरज चोप्राच्या भाल्याचा ‘सुवर्ण’वेध
2 Ind vs Eng : साकलेन मुश्ताक म्हणतो विराट सचिनच्या जवळ पोहोचणार…
3 Asian Games 2018 : द्युती चंदला ओडीशा सरकारकडून १.५ कोटींचं बक्षिस
Just Now!
X