News Flash

‘टीम इंडिया’त निवडल्या गेलेल्या हनुमा विहारीने मैदानावर उतरण्याआधीच केला ‘हा’ पराक्रम

दुखापतीने ग्रस्त असलेला अश्विन जर सामान्यापर्यंत तंदुरुस्त झाला नाही, तर हनुमाला अंतिम संघात स्थान मिळवता येऊ शकते.

हनुमा विहारी

इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात भारताकडून मुंबईकर पृथ्वी शॉ याची निवड करण्यात आली. तर आंध्र प्रदेशचा कर्णधार हनुमा विहारी यालादेखील अनपेक्षितपणे संघात स्थान देण्यात आले. बीसीसीआयने टि्वट करून संघाबाबत माहिती दिली.

हनुमा विहारीला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसून भारत इंग्लंड कसोटी सामन्यात तो प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. हनुमा विहारी हा अष्टपैलू खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या सामन्यात हनुमाने ५४ धावांची खेळी केली होती. तर याच संघाविरुद्ध झालेल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात त्याने १४८ धावांची जोरदार खेळीही केली होती.

या दोन सामन्यात हनुमाला संधी मिळेल की नाही याबाबत खात्री नसली, तरी मैदानावर उतरण्याआधीच हनुमाने एक पराक्रम केला आहे. हनुमाच्या निमित्ताने भारतीय कसोटी संघात १९ वर्षानंतर आंध्र प्रदेशच्या एखाद्या खेळाडूची निवड झाली आहे. याआधी भारतीय संघाचे सध्याचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद हे भारतीय संघाकडून खेळले होते.

दरम्यान, दुखापतीने ग्रस्त असलेला अश्विन जर सामान्यापर्यंत तंदुरुस्त झाला नाही, तर हनुमाला अंतिम संघात स्थान मिळवता येऊ शकते. तो उद्या सकाळी इंग्लंडला प्रयाण करणार असून २४ ऑगस्टला इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे, अशी माहितीही त्याने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2018 11:10 pm

Web Title: hanuma vihari first andhra cricketer in 19 years to be picked in indias test squad
टॅग : Hanuma Vihari
Next Stories
1 Ind vs Eng : ‘टीम इंडिया’तील निवडीबाबत हनुमा विहारी म्हणतो…
2 Ind vs Eng : मुंबईकर पृथ्वी शॉ ला ‘टीम इंडिया’त संधी; उर्वरित कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर
3 Asian Games 2018 : सुवर्णपदक विजेत्या राही सरनौबतला ५० लाखांचे बक्षीस
Just Now!
X