28 October 2020

News Flash

IPL 2020 : हरभजन शिवाय UAE ला रवाना होणार CSK चा संघ, कारण…

१९ सप्टेंबरपासून युएईत रंगणार IPL चा तेरावा हंगाम

हरभजन सिंह - १६०

भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आणि चेन्नई सुपरकिंग्जचा महत्वाचा खेळाडू हरभजन सिंह आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत युएईला रवाना होणार नाहीये. २० ऑगस्टनंतर सर्व संघांना युएईला रवाना होण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतू आपल्या आईच्या आजारपणामुळे हरभजनने आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन आठवड्यांनी हरभजन युएईला रवाना होणार असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलेलं आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : UAE मध्ये Bio Secure Bubble तयार करण्याचं कंत्राट UK मधील कंपनीला

२० ऑगस्टपर्यंत CSK चे खेळाडू चेन्नईतील एम.ए.चिदंबरम मैदानावर सराव करणार आहेत. आपल्या आईच्या तब्येतीविषयीची माहिती हरभजनने चेन्नईच्या संघप्रशासनाला दिली असून दोन आठवड्यात युएईला रवाना होणार असल्याचंही हरभजनने सांगितलं आहे. २०१८ च्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जने हरभजनसाठी २ कोटींची किंमत मोजत त्याला आपल्या संघात घेतलं होतं. याआधी हरभजन मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर हे दोन महत्वाचे खेळाडूही CSK कँपला हजर राहू शकले नव्हते. संघ युएईला रवाना होण्याआधी ते चेन्नईत दाखल होणार असल्याचं समजतंय. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये आयपीएलचा तेरावा हंगाम रंगणार आहे.

अवश्य वाचा – चिनी कंपनीच्या गुंतवणूकीनंतरही Dream 11 ला IPL स्पॉन्सरशिप, BCCI म्हणतं…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:37 pm

Web Title: harbhajan singh not to travel to dubai with chennai super kings squad psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : चाहत्यांना ‘गुड मॉर्निंग गिफ्ट’!; राजस्थान, पंजाब संघ युएईला रवाना
2 VIDEO : सलाम! क्रिकेटपटूच्या ‘त्या’ कृत्याचं नेटिझन्सकडून तोंडभरून कौतुक
3 IPL 2020 : UAE मध्ये Bio Secure Bubble तयार करण्याचं कंत्राट UK मधील कंपनीला
Just Now!
X