22 September 2020

News Flash

पांड्या बंधू म्हणतायत, “व्हाय धिस कोलावरी.. कोलावरी डी…”; पहा Video

कृणाल-हार्दिक यांच्यातील जुगलबंदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

विंडिजविरुद्धचा भारताचा पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. गयाना येथे दिवसभर पावसाने हजेरी लावल्यामुळे मैदानाच्या बऱ्याच भागावर पाणी साचले होते. पावसाने उसंत घेतल्यानंतर सामन्याला सुरुवातही झाली होती, मात्र तिसऱ्यांदा पावसाने हजेरी लावल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन दोन्ही पंचांनी सामना रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेतला. त्यानंतर आता दुसरा सामना रविवारी होणार आहे. त्या दरम्यान पांड्या बंधूंनी कॅरिओकेचा आनंद लुटला.

भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी २० मालिका ३-० अशी खिशात घातली. यातील पहिले दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये होते. तर तिसरा सामना गयाना येथे झाला. तीनही सामने भारताने जिंकले आणि मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. या मालिकेत कृणालला टी २० संघात स्थान मिळाले होते, तर दुखापतीमुळे हार्दिक पांड्या या दौऱ्यातील एकाही संघात मिळू शकलेले नाही. भारताची टी २० मालिका संपली असल्याने आता दोघांकडेही मोकळा वेळ आहे. या मालिकेत ३ बळी आणि ६७ धावा केल्या. टी २० मालिका संपवून कृणाल मायदेशी परतला. त्यामुळे या दोघांनी कॅरिओकेचा आनंद घेत ‘व्हाय धिस कोलावरी डी’ या गाण्यावर सूर लावला आहे.

आठ वर्षांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकुळ घातलेले ‘व्हाय धिस कोलावरी डी’ हे गाणं पांड्या बंधूंनी गायलं. हार्दिक आणि कृणाल यांनी त्यांच्या मित्रांसोबत एक पार्टी आयोजित केली होती. त्यात पांड्या बंधुंनी कॅरिओके सेशनमध्ये सहभाग घेतला. कृणाल व हार्दिक या पांड्या बंधुंची जुगलबंदी पाहायला मिळाली. त्यात या दोघांनी ‘कोलावरी डी’ हे गाणं गायलं. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 6:39 pm

Web Title: hardik pandya krunal pandya why this kolaveri di song karaoke singing video vjb 91
Next Stories
1 Video : दे दणादण! दोन षटकार अन् फोडल्या दोन काचा…
2 …म्हणून साक्षीला येतेय धोनीची आठवण
3 अबब! विडिंजच्या संघातील हा ‘अगडबंब’ खेळाडू पाहिलात का?
Just Now!
X