26 February 2021

News Flash

‘या’ मराठी खेळाडूला पाहून हरमनप्रीतने सुधारला आपला खेळ

हरमनप्रीतच्या यशाच मुंबईकर खेळाडूचा हातभार!

हरमनप्रीत कौर ( संग्रहीत छायाचित्र )

गेले काही दिवस हरमनप्रीत कौर देशभरातल्या लोकांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. उपांत्य सामन्यातलं नाबाद अर्धशतक आणि अंतिम सामन्यात कठीण प्रसंगात झळकावलेलं संयमी अर्धशतक यामुळे तिच्यावर अनेक ठिकाणांहून बक्षिसाचा वर्षाव होतोय. मात्र हरमनप्रीतने आपल्या खेळात झालेल्या सुधारणेचं श्रेय एका मराठी खेळाडूला दिलेलं आहे.

अजिंक्य रहाणे,

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये अजिंक्य रहाणेने आपल्याया फलंदाजीच्या अनेक टीप्स दिल्याचं हरमनप्रीतने मान्य केलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य याच मैदानात सराव करत होता, यावेळी नेट्समध्ये त्याचा सराव पाहून मी अनेक गोष्टी शिकले असं हरमनप्रीतने सांगितलं आहे.

कित्येकदा गोलंदाजांच्या फुलटॉस बॉलवरह अजिंक्य रहाणे फार मोठा फटका न खेळता संयमाने धाव घेतो. अजिंक्यकडून मी सरावादरम्यान खूप मोठी शिकवण घेतली. ”जर आपण आपल्यातली शैली विकसीत केली आणि तिच्यावर ठाम रहायचं ठरवलं, तर हरप्रकारे प्रयत्न करुन आपण ती जपायला हवी. आंतराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूच्या अंगात जसा आक्रमकपणा असावा लागतो तेवढाच तो खेळाडू शांतही असावा लागतो.” अजिंक्य रहाणेकडून मिळालेल्या टिप्सबद्दल हरमनप्रीत कौर बोलत होती.

विराट कोहली हा आपला सर्वात आवडता खेळाडू असला, तरीही मला अजिंक्य रहाणेसोबत मैदानात एकदा तरी खेळायचं आहे, असं हरमनप्रीत कौर म्हणाली. उपांत्य सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या हरमनप्रीत कौरने अंतिम सामन्यातही अर्धशतकी खेळी केली. विश्वचषकातल्या तिच्या कामगिरीमुळे सध्या तिच्यावर सर्व बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होतोय. याशिवाय बीसीसीआय, पंजाबचे मुख्यमंत्री आणि ती काम करत असलेल्या पश्चिम रेल्वेनेही तिला रोख रकमेचं बक्षिस जाहीर केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 10:55 pm

Web Title: harmanpreet kaur says ajinkya rahane give lots of tips to improved her game wants to play with him
Next Stories
1 ‘सिक्सर क्वीन’ हरमनप्रीतच्या ‘त्या’ षटकाराची कहाणी
2 ‘त्या’ खेळीबद्दल हरमनप्रीत कौरला आणखी एक बक्षिस
3 झुलनच्या ड्रीम स्पेलवर भारतीय खेळाडू खूश
Just Now!
X