29 February 2020

News Flash

वर्ल्ड कप इंग्लंडचा; पण ICC क्रमवारीत कोहली, बुमराहच अव्वल

रोहित शर्माचीही क्रमवारीत दमदार कामगिरी

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने रविवारी न्यूझीलंडला पराभूत केले. न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडला चांगलीच झुंज दिली, पण अखेर इंग्लंडचा संघ चौकार षटकारांच्या निकषावर विजेता ठरला. पण असे असले तरीही ICC च्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हेच अव्वल आहेत.

विश्वचषकानंतर ICC ने सर्वोत्तम ११ चा संघ जाहीर केला. या संघात विराट कोहलीला स्थान मिळाले नाही. पण तरीही ICC च्या यादीमध्ये कोहलीच फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. विश्वचषकानंतर ICC ने एकदिवसीय क्रिकेटमधील खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमावारीत फलंदाजांच्या यादीमध्ये कोहलीने ८८६ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. फलंदाजांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितच्या नावे ८८१ गुण आहेत.

ICC च्या गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह ८०९ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आहे. याशिवाय विश्वचषकात अप्रतिम कामगिरी करणारा बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन हा अष्टपैलू क्रमवारीमध्ये अव्वल आहे. तर अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेला इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱ्या स्थानावर आहे. महत्वाचे म्हणजे या क्रमवारीत तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर अफगाणिस्तानचे मोहम्मद नबी आणि रशिद खान हे दोन खेळाडू आहे. संघाच्या क्रमवारीत इंग्लंड अव्वल स्थानी असून त्यांनी भारतावर ३ गुणांची आघाडी घेतली आहे.

First Published on July 16, 2019 9:48 am

Web Title: icc odi rankings virat kohli jasprit bumrah top in rankings rohit sharma shakib al hasan england team india vjb 91
Next Stories
1 ‘ओव्हर-थ्रो’च्या धावा सहा नव्हे, पाचच!
2 ‘आयसीसी’च्या चौकारांच्या नियमावर टीकास्त्र!
3 चौकार मोजणे योग्य आहे का? – विल्यम्सन
X
Just Now!
X