News Flash

ICC T20 Rankings – कुलदीप यादवची गरुडझेप, केली कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी

विंडीजविरुद्ध झालेल्या मालिकेत कुलदीप ठरला मालिकावीर

ICC T20 Rankings – भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) T20 क्रमवारीत १४ स्थानांची गरुडझेप घेतली आहे. ICCने सोमवारी ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली. त्यात विंडीजविरुद्ध झालेल्या मालिकेत मालिकावीर ठरलेल्या कुलदीप यादवला मोठी बढती मिळाली असून तो २३व्या स्थानी विराजमान झाला आहे. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याशिवाय कर्णधार रोहित शर्मालादेखील ३ स्थानांची बढती मिळाली आहे.

 

 

गोलंदाजांच्या यादीत भारताच्या कुलदीपसह भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनाही क्रमवारीत बढती मिळाली आहे. कुमार ९ स्थाने वर चालून १९व्या स्थानी पोहोचला आहे. तर बुमराह पाच स्थाने वर चढून २१व्य स्थानी पोहोचला आहे. तर फिरकीपटू युझवेन्द्र चहलने आपले चौथे स्थान परत मिळवले आहे.

फलंदाजांच्या यादीत कर्णधार रोहित शर्माने ३ स्थानांची उडी घेत ७व्या क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या सामन्यात केलेल्या नाबाद १११ धावांच्या खेळीच्या जोरावर त्याला हा पराक्रम करता आला. सलामीवीर शिखर धवनने पाच स्थानांची उडी घेत १६वा तर ऋषभ पंतने ४१ गुण कमावत १००वे स्थान पटकावले आहे. लोकेश राहुल मात्र आपल्या चौथ्या स्थानी कायम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 5:43 pm

Web Title: icc t20 rankings kuldeep yadav jumps 14 places to a career high no 23 in the bowlers rankings
Next Stories
1 रोहितच्या नेतृत्वाखालील संघाला विराटने दिली कौतुकाची पावती
2 व्हाईटवॉश लाजिरवाणा पण झुंज दिल्याचे समाधान – ब्रेथवेट
3 Video : भर मैदानात तो कपडे काढून पळत सुटला आणि…
Just Now!
X