भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारपासून टी-20 मालिकेला सुरुवात होते आहे. विशाखापट्टणमच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी महेंद्रसिंह धोनीने नेट्समध्ये कसून सराव केला आहे. त्याच्या या सरावाचा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

धोनीसोबत कर्णधार विराट कोहली, उमेश यादव आणि अन्य खेळाडूंनीही नेट्समध्ये सराव केला.

2 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, कृणाल पांड्या, विजय शंकर, सिद्धार्थ कौल, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, मयांक मार्कंडे