विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत सामन्यात बांगलादेशवर डावाने विजय मिळवला. २ कसोटी सामन्यांची मालिका भारताने २-० ने खिशात घातली. कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात १३६ धावांची खेळी करत गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र कसोटीत भारताकडून पहिलं शतक झळकावण्याचा बहुमान पटकावला. विराट कोहलीने आपल्या शतकाचं श्रेय भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरला दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – ऐतिहासिक विजयासह विराट कोहलीला मानाच्या पंगतीत स्थान

सामना संपल्यानंतर विराट कोहलीने आपल्या शतकी खेळीमागचं गुपित उलगडलं. “दिवस-रात्र कसोटीत दुपारचं सत्र खेळण्यासाठी खूप सोपं असतं. मी सचिन सरांशी बोलत होतो, त्यांनी मला फलंदाजीसाठी मोलाचा सल्ला दिला. गुलाबी चेंडूवर खेळताना दुसरं सत्र हे पहिल्या सत्रासारखं समज, ज्यावेळी काळोख होतो त्यावेळी चेंडू स्विंग होईल. पारंपरिक कसोटीत अखेरच्या सत्रात फलंदाजी करणं अवघड होतं. मात्र, दिवस-रात्र कसोटीतलं दुसरं सत्र हे पारंपरिक कसोटीच्या पहिल्या सत्राप्रमाणे खेळलं तर सोपं होईल.” विराटने सचिनने दिलेला सल्ला सर्वांना सांगितला.

अवश्य वाचा – टीम इंडियाच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीचे मानकरी, जाणून घ्या एका क्लिकवर

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा हा सलग सातवा विजय ठरला आहे. याचसोबत कसोटीत सलग ४ सामने डावाने जिंकण्याचा मानही भारतीय संघाला मिळाला आहे. याआधी २०१३ साली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सलग ६ विजयांची नोंद केली होती. २०१९ वर्षातला भारतीय संघाचा हा अखेरचा कसोटी सामना होता. यानंतर भारतीय संघाला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांच्या क्रिकेट मालिकेला सामोरं जावं लागणार आहे.

अवश्य वाचा – IND vs BAN : गुलाबी कसोटीत ‘विराट’सेनेची ऐतिहासिक कामगिरी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban 2nd test kolkata virat kohli thanks sachin tendulkar for his input which help him to slam century psd
First published on: 24-11-2019 at 20:01 IST