ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा कार्यक्रम जाहीर

भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रस्तावित मालिकेला मुहूर्त अद्याप सापडलेला नसला, तरी या परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांना मात्र १९ मार्च २०१६ हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जास्त उत्सुकता असलेला भारत-पाकिस्तान पुरुष संघातील सामना धरमशाला शहरात आणि महिलांचा सामना नवी दिल्ली येथे खेळवण्यात येणार आहे.
मुंबईत शुक्रवारी झालेल्या एका शानदार कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ८ मार्च ते ३ एप्रिल या २७ दिवसांच्या कालावधीत भारतातील बंगळुरू, चेन्नई, धरमशाला, कोलकाता, मोहाली, मुंबई, नागपूर आणि नवी दिल्ली अशा आठ शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पध्रेत एकूण ५८ सामने होणार असून, यात पुरुषांचे ३५ आणि महिलांचे २३ सामने असतील. नवी दिल्ली आणि मुंबईला अनुक्रमे ३० आणि ३१ मार्चला उपांत्य फेरीचे सामने होतील, तर कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर ३ एप्रिलला अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे.
पाकिस्तानशी सामना करण्यापूर्वी १५ मार्चला भारतीय संघाचा नागपूर येथे न्यूझीलंडशी सलामीचा सामना रंगणार आहे. त्यानंतर २३ मार्चला बंगळुरूला पात्रता फेरीतून आलेल्या संघाशी भारताचा सामना होईल, तर २७ मार्चला मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे.
२०१४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेच्या पारितोषिक रकमेत यंदा ८६ टक्क्यांनी वाढ झाली असून, एकूण ५६ लाख डॉलर्सची पारितोषिके देण्यात येणार आहेत. महिलांच्या स्पध्रेसाठी १२२ टक्के वाढ करण्यात आली असून, एकूण चार लाख डॉलर्सची बक्षीसे देण्यात येणार आहेत. पुरुषांच्या आतापर्यंत झालेल्या पाच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत प्रत्येक वेळी नवा जगज्जेता ठरला आहे. मात्र महिलांमध्ये २००९चे पहिलेवहिले विश्वविजेतेपद इंग्लंडने पटकावल्यानंतर २०१०, २०१२ आणि २०१४मध्ये सलग तीनदा ऑस्ट्रेलियाने जेतेपदावर नाव कोरले आहे.
पुरुषांमध्ये प्राथमिक फेरीचे सामने ८ ते १३ मार्च या कालावधीत धरमशाला आणि नागपूरला होणार आहेत. अ-गटात बांगलादेश, नेदरलँड्स, आर्यलड, ओमानचा समावेश आहे, तर ब-गटात झिम्बाब्वे, स्कॉटलंड, हाँगकाँग, अफगाणिस्तानचा समावेश आहे. दोन्ही गटांतून एकेक संघ अव्वल-१० संघांच्या दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील. पहिल्या गटात श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ब-गटातील विजेता असे पाच संघ असतील, तर दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अ-गटातील विजेता असे पाच संघ असतील.

भारतामध्ये क्रिकेट हा धर्म मानला जातो आणि या देशासारखे क्रिकेटप्रेम फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. १९८७, १९९६ आणि २०११मध्ये आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचे शानदार संयोजन करणारे बीसीसीआय ही स्पर्धासुद्धा यशस्वी करेल. आयसीसी व बीसीसीआय बांधिलकीने मेहनत घेऊन स्पर्धा संस्मरणीय ठरवेल. जगभरातील क्रिकेटरसिकांना या स्पध्रेचा थरार पाहण्यासाठी भारतात येण्याचे मी आवाहन करतो.
– शशांक मनोहर,
आयसीसीचे कार्याध्यक्ष

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे हिमाचल प्रदेशमधील धरमशाला हे भारत-पाकिस्तान यांच्यातील गरमागरम सामन्यासाठी योग्य ठिकाण आहे.ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी धरमशालाचे वातावरण अनुकूल ठरले.
– अनुराग ठाकूर, बीसीसीआयचे सचिव

पहिली फेरी (गटविजेता पुढील फेरीसाठी पात्र)

अ गट :
बांगलादेश
नेदरलँड
आर्यलड
ओमान

ब गट :
झिम्बाब्वे
स्कॉटलंड
हाँग काँग
अफगाणिस्तान

विश्वचषक
ट्वेन्टी-२०
स्पर्धा २०१६

तारीख सामना स्थळ

८ मार्च झिम्बाब्वे विरुद्ध हाँग काँग नागपूर
स्कॉटलंड विरुद्ध अफगाणिस्तान नागपूर
८ मार्च बांगलादेश विरुद्ध नेदरलँड धरमशाला
आर्यलड विरुद्ध ओमान धरमशाला
१० मार्च स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे नागपूर
हाँग काँग विरुद्ध अफगाणिस्तान नागपूर
११ मार्च नेदरलँड विरुद्ध ओमान धरमशाला
बांगलादेश विरुद्ध आर्यलड धरमशाला
१२ मार्च झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान नागपूर
स्कॉटलंड विरुद्ध हाँग काँग नागपूर
१३ मार्च नेदरलँड विरुद्ध आर्यलड धरमशाला बांगलादेश विरुद्ध ओमान धरमशाला

मुख्य स्पर्धा

अव्वल-१० गट पहिला :
श्रीलंका
दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडिज
इंग्लंड
‘ब’ गटातील विजेता (ब-१)

अव्वल-१० गट दुसरा:
भारत
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड
‘अ’ गटातील विजेता (अ-१)
तारीख सामना स्थळ

१५ मार्च भारत विरुद्ध न्यूझीलंड नागपूर
१६ मार्च वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लड मुंबई
पाकिस्तान विरुद्ध अ-१ कोलकाता
१७ मार्च श्रीलंका विरुद्ध ब-१ कोलकाता
१८ मार्च ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड धरमशाला
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड मुंबई
१९ मार्च भारत विरुद्ध पाकिस्तान धरमशाला
२० मार्च दक्षिण आफ्रिका विरुद्ध ब-१ मुंबई
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज बंगळुरू
२१ मार्च ऑस्ट्रेलिया विरुद्ध अ-१ बंगळुरू
२२ मार्च न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान मोहाली
२३ मार्च इंग्लंड विरुद्ध ब-१ नवी दिल्ली
भारत विरुद्ध अ-१ बंगळुरू
२५ मार्च पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया मोहाली
दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज नागपूर
२६ मार्च अ-१ विरुद्ध न्यूझीलंड कोलकाता इंग्लंड विरुद्ध श्रीलंका नवी दिल्ली
२७ मार्च भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मोहाली
ब-१ विरुद्ध वेस्ट इंडिज नागपूर
२८ मार्च दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका नवी दिल्ली

३० मार्च पहिला उपांत्य सामना नवी दिल्ली

(पहिल्या गटातील द्वितीय विरुद्ध दुसऱ्या गटातील अव्वल)

३१ मार्च दुसरा उपांत्य सामना मुंबई

(पहिल्या गटातील अव्वल विरुद्ध दुसऱ्या गटातील द्वितीय)

३ एप्रिल अंतिम फेरी कोलकाता

विश्वचषक
ट्वेन्टी-२० स्पर्धा २०१६ (महिला)

अ गट :
ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिका
न्यूझीलंड
श्रीलंका
आर्यलड

ब गट :
इंग्लंड
वेस्ट इंडिज
भारत
पाकिस्तान
बांगलादेश

तारीख सामना स्थळ

१५ मार्च भारत विरुद्ध बांगलादेश बंगळुरु
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका नवी दिल्ली
१६ मार्च वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान चेन्नई
१७ मार्च इंग्लंड विरुद्ध बांगलादेश बंगळुरू
१८ मार्च न्यूझीलंड विरुद्ध आर्यलड मोहाली
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका नागपूर
१९ मार्च भारत विरुद्ध पाकिस्तान नवी दिल्ली
२० मार्च वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश चेन्नई
श्रीलंका विरुद्ध आर्यलड मोहाली
२१ मार्च ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड नागपूर
२२ मार्च इंग्लंड विरुद्ध भारत धरमशाला
२३ मार्च दक्षिण आफ्रिका विरुद्ध आर्यलड चेन्नई
२४ मार्च इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज धरमशाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका नवी दिल्ली
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश नवी दिल्ली
२६ मार्च ऑस्ट्रेलिया विरुद्ध आर्यलड नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड बंगळुरू
२७ मार्च वेस्ट इंडिज विरुद्ध भारत मोहाली
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान चेन्नई
२८ मार्च दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका बंगळुरू

३० मार्च उपांत्य फेरी नवी दिल्ली

(अ गटातील द्वितीय विरुद्ध ब गटातील अव्वल )

३१ मार्च उपांत्य फेरी मुंबई

( अ गटातील अव्वल विरुद्ध ब गटातील द्वितीय)

३ एप्रिल अंतिम फेरी कोलकाता