News Flash

बुमराहचा विक्रम मोडण्यापासून चहल दोन पावलं दूर

दुसऱ्या सामन्यात चहल करणार का हा कारनामा?

कॅनबेरा येथील मनुका ओव्हलवर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी पराभव केला होता. या विजयासह तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारताकडून जाडेजा, राहुल, चहल आणि नटराजन यांच्या कामगिरीच्या बळावर भारतानं विजय संपादन केला. चहल आणि नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दुसऱ्या सामन्यात चहलनं तीन विकेट घेत टी-२० सामन्यात ५८ विकेट पूर्ण केल्या.

चहलनं ४३ डावांत ५८ विकेट घेतल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक टी-२० विकेट घेण्याऱ्या गोलंदाजामध्ये चहल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराहनं ४९ डावांत ५९ विकेट विकेट घेतल्या आहेत. चहलने दुसऱ्या टी-२० सामन्यात एक विकेट घेतल्यास बुमराहची बरोबरी करेल. एकपेक्षा जास्त विकेट घेतल्यास चहल भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल.

भारतीय संघाकडून टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज –

 

 

 

 

 

 

 

 

दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानं विराट सेना रविवारी मैदानात उतरेल. मात्र दुसरा आणि तिसरा टी-२० सामना सिडनी येथे होणार आहे. सिडनीच्या मैदानावर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 5:35 pm

Web Title: india tour of australia 2020 ind vs aus chahal bumrah wiket nck 90
Next Stories
1 न्यूझीलंडचा कोरी अँडरसन निवृत्त, आता अमेरिकेकडून खेळणार
2 जाडेजाच्या दुखापतीवर मांजेरकरांचे प्रश्नचिन्ह; नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप
3 सचिनसाठी आजची तारिख आहे खास; जाणून घ्या का?
Just Now!
X