24 October 2020

News Flash

शंभराव्या सामन्यात धडाकेबाज शतकी खेळी, भारताच्या ‘गब्बर’चा अनोखा विक्रम

शिखरची विराटसोबत शतकी भागीदारी

चौथ्या सामन्यात शतकी खेळी करणारा शिखर धवन

पहिल्या ३ सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात केल्यानंतर जोहान्सबर्ग येथील चौथ्या वन-डे सामन्यात, भारताचा सलामीवीर शिखर धवनने ऐतिहासीक खेळी केली आहे. आपल्या कारकिर्दीचा १०० वा सामना खेळणाऱ्या शिखर धवनने आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी केली. अशी कामगिरी करणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. शिखरचं वन-डे कारकिर्दीतलं हे १३ वं शतकं ठरलं. जोहान्सबर्गमध्ये आज वादळाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती, यानुसार सामन्यात विजांच्या कडकडाटांनी व्यत्यय आणल्याामुळे पंचांनी सामना थांबवला. यावेळी शिखर धवन १०७ धावांवर नाबाद राहून खेळत होता.

मालिकेत तीन वेळा शतकाची संधी हुकल्यानंतर धवनने अखेर शतकाला गवसणी घातली आहे. पहिल्या ३ सामन्यांपैकी दोन सामन्यात शिखरने अर्धशतकी खेळी केली होती. यामुळे चौथ्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर शिखर धवनने आपल्या नेहमीच्या शैलीत दोन्ही हात पॅव्हेलियनकडे उंचावत आपल्या सहकाऱ्यांना अभिवादन केलं. वादळ आणि विजांचं संकट टळून गेल्यानंतर शिखर धवन आधीच्या धावसंख्येत अवघ्या २ धावांची भर घालून माघारी परतला.

१०० वन-डे सामने खेळल्यानंतर भारताकडून सर्वाधिक धावा पटकावण्याचा बहुमानही शिखर धवनने पटकावला आहे. या यादीमध्ये आफ्रिकेचा हाशिम आमला शिखर धवनच्या पुढे आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने रोहित शर्माला लवकर गमावलं, मात्र त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांनी शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 8:30 pm

Web Title: india tour of south africa 2018 shikhar dhawan become first indian to score century in his 100th odi
Next Stories
1 रंगना हेरथने रचला इतिहास, श्रीलंकेच्या विजयाला ‘चार चाँद’
2 चौथ्या वन-डेत दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी, मालिकेतलं आव्हान अद्यापही कायम
3 २०२१ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचं यजमानपद धोक्यात, आयसीसीकडून इतर पर्यायांचा शोध सुरु
Just Now!
X