महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरीही, जगभरात त्याचं फॅनफॉलोईंग वाढतच जातंय. कित्येक वेळा सामन्यांदरम्यान, खासगी कार्यक्रमांमध्ये धोनीसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडालेली असते. धोनीच्या लोकप्रियतेचा प्रत्यय नुकताच श्रीलंकेत सुरु असलेल्या वन-डे सामन्यांदरम्यान आलेला आहे.

अवश्य वाचा – एक पाय मोडला तरी पाकिस्तानविरुद्ध खेळेन : धोनी

कोलंबोत भारताचा उद्या श्रीलंकेच्या संघाशी चौथा वन-डे सामना होणार आहे. यासाठी भारतीय संघ नेट्समध्ये सरावासाठी उतरला होता. यावेळी फलंदाजीचा सराव करताना भारतीय संघाची सुरक्षाव्यवस्था भेदून एक चाहता धोनीसोबत सेल्फी काढण्यासाठी पुढे आला. सर्वात प्रथम या चाहत्याने रोहीत शर्माला धोनी समजून त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र रोहीतने त्याला आपण धोनी नसल्याचं सांगत, धोनीकडे पाठवलं.

अवश्य वाचा – VIDEO: …अन् धोनी मैदानावरच झोपला

सरावादरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे सर्वच आश्चर्यचकीत झाले. अखेर धोनीसोबत सेल्फी घेतल्यानंतर या चाहत्याने सरावाच्या जागेतून काढता पाय घेतला. काही वेळानंतर चौकशी केली असता या व्यक्तीचं नाव, आर. प्रेमदास असल्याचं कळतंय. हा व्यक्ती कोलंबोच्या मैदानात कर्मचारी असल्याने त्याला मैदानात सरावाच्या ठिकाणी सहज प्रवेश मिळवता आल्याचं बोललं जातंय. या प्रकाराचा धोनीवर कोणत्याही प्रकारे परिणाम झाला नाही. सेल्फीकाढून झाल्यानंतर धोनीने प्रेमदासला सरावाची जागा सोडण्याची विनंती केली. त्याला मान देऊन प्रेमदासनेही धोनीशी शेकहँड करत सरावाची जागा सोडली.

याप्रकारानंतर भारतीय संघाने पुन्हा एकदा सरावाला सुरुवात केली. मात्र केवळ एका सेल्फीसाठी भारतीय संघाचा सराव थांबवणाऱ्या या चाहत्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगलेली होती.

अवश्य वाचा – तुम्ही काळजी करु नका, धोनी योग्य वेळी निवृत्त होईल!