India vs Australia,1st ODI Update: आठ महिन्यांच्या प्रदिर्घ विश्रांतीनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ २७ नोव्हेंबरपासून मैदानावर उतरणार आहे. विराट सेना ऑस्ट्रेलियाविरोधात उद्या पहिला एकदविसीय सामना खेळणार आहे. तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेला सिडनी येथील मैदानावरुन सुरुवात होणार आहे. भारतीय संघ जेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल तर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया देखील मजबूत आहे. पाहूयात हा समना कधी आणि कुठे पाहाल? काय आहे पीच रिपोर्ट…

पहिल्या सामन्याची वेळ?
भारत आणि ऑस्ट्रेलियातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी नाणेफेक होणार आहे तर ९.१० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.

कुठे पाहाल?
पहिल्या एकदविसीय सामन्याचं लाइव्ह प्रसारण Sony Six, Sony TEN 1, आणि Sony TEN 3 वर होणार आहे. त्याशिवाय Sony Liv या अॅपवरही सामना पाहू शकता.

कसं आहे वातावरण ?
२७ नोव्हेंबर रोजी सिडनीमध्ये ऊन पडण्याची शक्यता आहे. येथील तापमान जवळपास २४ डिग्रीच्या जवळापस राहिल. पावसाची शक्यता खूप कमी आहे.

पिच रिपोर्ट –
सिडनी क्रिकेट ग्राऊंडचं मैदान नेहमीच फलंदाज आणि गोलंदाजाला मदत करणारं आहे. फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळण्याची शक्यता आहे.

पहिल्या सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ?

मयंक अग्रवाल, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर/नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, मोहम्मद शामी आणि जसप्रीत बुमराह.

असा असू शकतो ऑस्ट्रेलियाचा संघ –
डेविड वॉर्नर, एरॉन फिंच (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, एलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड आणि अॅडम जम्पा.

भारताच्या संपुर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं लाईव्ह कव्हरेज पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉमला नक्की भेट द्या….