अहमदाबादच्या नव्या कोऱ्या नरेंद्र मोद क्रिकेट स्टेडिअमवर फिरकीच्या बळावर भारताने गुरुवारी विजयाक्षरे उमटवली. या दोन दिवसीय फिरकीच्या महोत्सवाच्या बुधवारी पहिल्या दिवशी १३ आणि गुरुवारी दुसऱ्या दिवशी १७ फलंदाज बाद झाले. इंग्लंडचे ४९ धावांचे तटपुंजे लक्ष्य आरामात पेलत भारताने ७.४ षठकांत १० गडी राखून तिसरी कसोटी जिंकली आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. दोन्ही डावांत मिळून ११ बळी मिळवणारा अक्षर पटेल भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तिसरा कसोटी सामना दिवसात संपल्यानंतर अनेक दिग्गजांनी मोटेराच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

मोटेराच्या वळण घेणाऱ्या खेळपट्टीवर हरभजन सिंग आणि व्हीव्हीएस. लक्ष्मण यांसहित भारताच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली असून महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मात्र वेगळेच मत मांडले आहे. ‘बरेचसे खळाडू सरळ जाणाऱ्या चेंडूंवर बाद झाले. अतिबचावात्मक पवित्रा फलंदाजांना नडला. त्यामुळे खेळपट्टीला दोष देण्यापेक्षा विजयाचे श्रेय अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या बारताच्या फिरकीपटूंना जाते,’ असे गावसकर म्हणाले. ‘ही खेळपट्टी कसोटी सान्यासाठी गोय नव्हतीच. भारताचा पहिला डावही १४५ धावांवर संपुष्टात आला होता,’ अशी टीका लक्ष्मणने केली. हरभजन म्हणाला की, ‘ही खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य नव्हतीच इग्लंडने पहिल्या डावात २०० धावा उभारल्या असत्या तर भारतीय संघही अडचणीत सापडला असता. मात्र, खेळपट्टी दोन्ही संघासाठी सारखीच होती.’

युवराज काय म्हणाला?
सामना अवघ्या २ दिवसात संपला. निश्चितच हे कसोटी क्रिकेटसाठी चांगली बाब नाही. जर अशाच प्रकारच्या खेळपट्टीवर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी गोलंदाजी केली असती; तर आज त्यांच्या नावे ८०० ते १००० कसोटी विकेस्टची नोंद असती.

कोहलीकडून खेळपट्टीची पाठराखण –
खेळप्टी नव्हे तर सुमार फलंदाजीमुळे तिसरा कसोटी सामना दोन दिवसांत निकाली ठरला, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त करत मोटेराच्या खेळपट्टीची पाठराखण केली. पहिल्या जावात खेळपट्टी फलंदाजीसाठी पूर्णपणे योग्य होती. फक्त काही चेंडू अचानक उसळी घेत होते. माझ्या मते या सामन्यात दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली नाही. भारतीय संघ ३ बाद १०० अशा सुस्थितीत असतानाही १५० धावांच्या आत तंबूत परतला, असं कोहलीनं सांगितलं.

रुट काय म्हणाला?
‘मोटेराची खेळपट्टी खूपच आव्हानात्मक होती. येथे फलंदाजी करणं कठीण होतं. पण खेळपट्टी कशी होती, याचा निर्णय खेळाडू करु शकत नाही. हे आयसीसीचं काम आहे. पण एक खेळाडू म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपलं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करायचं असतं.’ पहिल्या डावांत मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आम्ही गमावली. पहिल्या डावांत आम्ही २५० पर्यंत धावसंख्या उभारली असती तर निकाल वेगळा लागला असता. ती संधी आम्ही गमावली.

खेळपट्टी सामान्यच- रोहित शर्मा</strong>
मोटेराची खेळपट्टी सर्वसामान्याच होती. यावर खेळण्यासाठी जिद्दीची आवश्यकता आहे. रोहितनं पहिल्या डावांमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. त्याचं श्रेय त्यानं सकारात्मक वृत्तीला दिलं. त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे आपण फक्त खेळपट्टीवर टिकून राहण्याचा नाही तर धावा काढण्याचा प्रयत्न केला, असंही रोहितनं सामन्यानंतर सांगितलं.