रायझिंग पुणे सुपरजायंट्सनी राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २७ रन्सनी विजय मिळवला आहे. आजच्या पराभवानंतर राॅयल चॅलेंजर्सच्या विराट कोहलीने प्रेझेंटेशनच्या वेळी ‘जर अशा प्रकारचा खेळ होत असेल तर आमची टीम जिंकायला लायक नाही’ अशा शब्दात आपला उद्वेग व्यक्त केला. बंगळुरूच्या बॅटिंगची सुरूवात पुण्यासारखीच झाली. चांगली सुरूवात होऊनदेखील पुण्याप्रमाणेच डावाच्या शेवटी भरपूर विकेट्स पडल्याने राॅयल चॅलेंजर्सना मॅच गमवावी लागली. पुण्याच्याही त्यांच्या डावादरम्यान बऱ्याच विकेट्स पडल्या होत्या पण शेवटी मनीष तिवारीने केलेल्या फटकेबाजीमुळे त्यांना १६१ ही धावसंख्या गाठता आली. बंगळुरूच्या बाबतीत त्यांना डावाच्या शेवटी कुठल्याही बॅटसमनने फटकेबाजी केली नाही

पुण्याच्या डावादरम्यान पुण्याचा निम्मा संघ १२९ ला पॅव्हेलियनमध्ये परतला.  १२७ ला २ विकेट्स या स्कोअरवरून पुण्याचा डाव १३० ला ७ विकेट्स अशा अतिशय दयनीय स्थितीत आला. या डावात १७०-१८० रन्सपर्यंत पुणे सहज पोहोचेल असं वाटत असताना या विकेट्स पडल्या आणि पुण्याच्या १५० रन्ससुध्दा होतील की नाही असा प्रश्न विचारला जाऊ लागला. पण मनीष तिवारीने असा प्रसंग येणं टाळलं

योगायोग म्हणजे बंगळुरूच्या संघाची १२६ रन्सवर असतानाच प्रचंड पडझड झाली. या मॅचच्या आधी गुणतालिकेमध्ये तळावर असलेला पुण्याचा संघ आता सहाव्या स्थानावर पोचला आहे आणि आता राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू सगळ्या टीम्सच्या मागे आहेत. आतापर्यंत ५ मॅचेसपैकी त्यांना ४ मॅचेसमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे.  खांद्याच्या दुखापतीतून सावरत विराट कोहली टीममध्ये परत आल्याने बंगळुरूची बाजू बळकट झाली होती. पण या मॅचमध्ये तरी विराट आपल्या बॅटिंगचा प्रभाव पाडू शकला नाही.

LIVE UPDATE

१०:३२- बंगळुरूच्या ३ झटपट विकेट्स

२३:२६- पवन नेगी पॅव्हेलियनमध्ये, मॅच उत्कंठवर्धक स्थितीत

२२:४९- डिव्हिलिअर्स यष्टिचीत

२२:४१ – डिव्हिलिअर्सचा मोठा सिक्सर!

२२:२५- विराट कोहली झेलबाद, बंगळुरू ४१/२

१०:०५- पुण्याला पहिली विकेट मिळाली, मनदीप सिंग पॅव्हेलियनमध्ये

१०:००- राॅयल चॅलेंजर्सच्या बॅटिंगला सुरूवात

९:५५- २० ओव्हर्समध्ये पुण्याच्या ८ विकेट्सच्या मोबदल्यात १६१ रन्स

९:४५- मनीष तिवारीची धुवाधार फटकेबाजी

९:३०- पुण्याची बॅटिंग कोसळली, १३०/७

९:०५- धोनीचा तुफान सिक्सर, बाॅल स्टेडियमच्या बाहेर

८:३५- विराट कोहलीचा जबरदस्त कॅच, राहुल त्रिपाठी माघारी

८:३९- पुण्याला पहिला धक्का, अजिंक्य रहाणे पॅव्हेलियनमध्ये

८:२९- पहिला स्ट्रॅटेजिक टाईमआऊट

८:२५ – पाच ओव्हर्समध्ये पुण्याच्या ५० रन्स धावफलकावर