IPL 2019 CSK vs KKR Live Updates : गुणतालिकेतील पहिल्या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकातावर ७ गडी राखून विजय मिळवला. कोलकाताच्या सुमार फलंदाजीमुळे त्यांना २० षटकात केवळ १०८ धावा करता आल्या. चेन्नईचा सलामीवीर फाफ डु प्लेसिस याच्या नाबाद ४३ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने १०९ धावांचे आव्हान ७ गडी राखून सहज पार केले.

१०९ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसन स्वस्तात झेलबाद झाला आणि चेन्नईला पहिला धक्का बसला. त्याने ९ चेंडूत १७ धावा केल्या. सुरेश रैनानेही चांगली सुरुवात केली होती. पण तोदेखील झेलबाद झाला. त्याला १४ धावांवर नरिनने झेलबाद केले. अंबाती रायडूने संयमी खेळी करत ३१ चेंडूत २१ धावा केल्या. पण त्यानंतर मोठा फटका मारताना तो झेलबाद झाला आणि चेन्नईला तिसरा धक्का बसला. पण सलामीवीर फाफ डु प्लेसिसने उत्तम फलंदाजी केली. त्याने ४३ धावांची नाबाद खेळी केली. त्यात केवळ ३ चौकार समाविष्ट होते.

त्याआधी नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर ख्रिस लिनला दीपक चहरने शून्यावर पायचीत केले. तर सुनील नरिनला हरभजन सिंगने ६ धावांवर झेलबाद केले. डावाच्या सुरुवातीला दुहेरी धक्क्यातून सावरण्याआधीच नितीश राणा माघारी परतला. त्यालाही दीपक चहरने शून्यावर माघारी धाडले. फटकेबाजी करत डावाला स्थैर्य देण्याच्या प्रयत्नात रॉबिन उथप्पाही स्वस्तात झेलबाद झाला. २ चौकार लगावत ११ धाव करून तो माघारी परतला. त्यामुळे कोलकाताची अवस्था ४ बाद २४ अशी झाली. जबाबदारीने खेळ करण्याची कर्णधार दिनेश कार्तिककडून अपेक्षा होती, पण फटकेबाजीच्या प्रयत्नात तो देखील झेलबाद झाला. त्याने २१ चेंडूत १९ धावा केल्या. युवा खेळाडू शुभमन गिल याला आजच्या सामन्यात चांगली करून दाखवण्याची संधी होती. पण तो इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला आणि कोलकाताला सहावा धक्का बसला. त्याने ९ धावा केल्या. काही काळ खेळपट्टीवर तग धरल्यावर पियुष चावला माघारी गेला. त्याने १३ चेंडूत ८ धावा केल्या. पाठोपाठ कुलदीप यादव (०) धावचीत झाला. लगेचच प्रसिधदेखील (०) झेलबाद झाला. रसलने एकाकी झुंज देत ४४ चेंडूत ५० धावा केल्या. त्याच्या फलंदाजीमुळे कोलकाताने २० षटकांत ९ बाद १०८ धावा केल्या. चहरने २० धावांत ३ बळी, हरभजन आणि इम्रान ताहीरने २-२ बळी तर जाडेजाने १ बळी टिपला.

Live Blog

23:11 (IST)09 Apr 2019
अंबाती रायडू झेलबाद; चेन्नईला तिसरा धक्का

अंबाती रायडूने संयमी खेळी करत ३१ चेंडूत २१ धावा केल्या. पण त्यानंतर मोठा फटका मारताना तो झेलबाद झाला आणि चेन्नईला तिसरा धक्का बसला.

22:21 (IST)09 Apr 2019
सुरेश रैना झेलबाद; चेन्नईला दुसरा धक्का

सुरेश रैनानेही चांगली सुरुवात केली होती. पण तोदेखील झेलबाद झाला. त्याला १४ धावांवर नरिनने झेलबाद केले.

22:09 (IST)09 Apr 2019
वॉटसन झेलबाद; चेन्नईला पहिला धक्का

चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसन स्वस्तात झेलबाद झाला आणि चेन्नईला पहिला धक्का बसला. त्याने ९ चेंडूत १७ धावा केल्या.

21:47 (IST)09 Apr 2019
चहरचा भेदक मारा; चेन्नईला १०९ धावांचे आव्हान

दीपक चहरचा भेदक मारा आणि त्याला इतर गोलंदाजांची मिळालेली साथ यामुळे चेन्नईने कोलकाताला २० षटकात ९ बाद १०८ धावांमध्ये रोखले. 

21:26 (IST)09 Apr 2019
पियुष, कुलदीप, प्रसिध झटपट बाद; कोलकाताचे ९ गडी माघारी

काही काळ खेळपट्टीवर तग धरल्यावर पियुष चावला माघारी गेला. त्याने १३ चेंडूत ८ धावा केल्या. पाठोपाठ कुलदीप यादव (०) धावचीत झाला. लगेचच प्रसिधदेखील (०) झेलबाद झाला.

20:49 (IST)09 Apr 2019
शुभमन गिल यष्टीचित; कोलकाताला सहावा धक्का

युवा खेळाडू शुभमन गिल याला आजच्या सामन्यात चांगली करून दाखवण्याची संधी होती. पण तो इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला आणि कोलकाताला सहावा धक्का बसला. त्याने ९ धावा केल्या.

20:42 (IST)09 Apr 2019
कर्णधार कार्तिक बाद; पन्नाशीच्या आतच कोलकाताचा निम्मा संघ तंबूत

जबाबदारीने खेळ करण्याची कर्णधार दिनेश कार्तिककडून अपेक्षा होती, पण फटकेबाजीच्या प्रयत्नात तो देखील झेलबाद झाला. त्याने २१ चेंडूत १९ धावा केल्या.

20:23 (IST)09 Apr 2019
रॉबिन उथप्पा झेलबाद; कोलकाताला चौथा धक्का

फटकेबाजी करत डावाला स्थैर्य देण्याच्या प्रयत्नात रॉबिन उथप्पाही स्वस्तात झेलबाद झाला. २ चौकार लगावत ११ धाव करून तो माघारी परतला. त्यामुळे कोलकाताची अवस्था ४ बाद २४ अशी झाली.

20:13 (IST)09 Apr 2019
नितीश राणा माघारी; कोलकाताला तिसरा धक्का

डावाच्या सुरुवातीला दुहेरी धक्क्यातून सावरण्याआधीच नितीश राणा माघारी परतला. त्यालाही दीपक चहरने शून्यावर माघारी धाडले.

20:10 (IST)09 Apr 2019
नरिन, लिन माघारी; कोलकाताला दुहेरी धक्का

कोलकाताच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर ख्रिस लिनला दीपक चहरने शून्यावर पायचीत केले. तर सुनील नरिनला हरभजन सिंगने ६ धावांवर झेलबाद केले.

19:50 (IST)09 Apr 2019
नाणेफेक जिंकून चेन्नईची प्रथम गोलंदाजी

नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.