चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या बाबतीत, रविवारच्या सामन्यात एक अनोखा योगायोग पहायला मिळाला. घरच्या मैदानावर खेळत असताना, राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात चेन्नईचे पहिले 3 फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर धोनी मैदानात आला.

अवश्य वाचा – Video : ऋषभ पंतचा हा भन्नाट झेल पाहिलात का??

जोफ्रा आर्चर टाकत असलेल्या सहाव्या षटकादरम्यान, एका बॉलने धोनीला पुरत चकवलं. यावेळी बॉल स्टम्पला जाऊल लागलाही, मात्र बेल्स न पडल्यामुळे धोनी बाद होता होता वाचला. या प्रकारानंतर राजस्थानच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरही काहीकाळ हास्य पसरलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

नाणेफेक जिंकून राजस्थानने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

अवश्य वाचा – IPL 2019 : दिल्ली विरुद्ध कोलकाता सामना फिक्स होता? BCCI ने दिलं स्पष्टीकरण