IPL 2019 DC vs CSK Updates – दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या अटीतटीच्या लढतीत चेन्नईने शेवटच्या षटकात दिल्लीवर ६ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करून चेन्नईपुढे १४८ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान त्यांनी २ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले. या बरोबरच चेन्नईने सलग दुसरा सामना जिंकला असून गुणतक्त्यात ते अव्वल स्थानी पोहोचले आहेत.

चेन्नईकडून आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईसाठी सर्वसाधारणपणे चांगली खेळी करणारा अंबाती रायडू झेलबाद झाला आणि चेन्नईला पहिला धक्का बसला. रायडूने ५ चेंडूत ५ धावा केल्या. यात त्याने १ चौकार लगावला. आपल्या कारकिर्दीला साजेशी खेळी करत फटकेबाजी करणारा वॉटसन माघारी परतला. अमित मिश्राच्या गोलंदाजीवर पंतने त्याला यष्टिचीत केले. वॉटसनने ४ चौकार आणि ३ षटकार खेचत ४४ धावा केल्या. डावाला चांगली सुरुवात मिळूनही सुरेश रैनाला मोठी खेळी करता आली नाही. अमित मिश्राच्या गोलंदाजीवर पंतने त्याचा झेल टिपला आणि चेन्नईचा तिसरा गडी माघारी परतला. मिश्राने दुसरा बळी घेतला. रैनाने १६ चेंडूत ३० धावा केल्या. यात त्याने ४ चौकार आणि १ षटकार खेचला. शेवटच्या षटकात २ धावा हव्या असताना केदार जाधव बाद झाला. त्याने २७ धावा केल्या. कर्णधार धोनीने मात्र शेवटपर्यंत खेळपट्टीवर तग धरला. धोनीने नाबाद ३२ धावा केल्या.

तत्पूर्वी, सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दीपक चहरच्या गोलंदाजीवर युवा फलंदाज पृथ्वी शॉ झेलबाद झाला आणि चेन्नईला पहिले यश मिळाले. पृथ्वीने धमाकेदार सुरुवात करत ५ चौकार लगावले होते. पण तो १६ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यर पायचीत झाला. इम्रान ताहीरने त्याला बाद केले आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. त्याने २० चेंडूत १८ धावा केल्या. पहिल्या सामन्यात झंझावाती खेळी करणारा ऋषभ पंत या सामन्यात फारसा प्रभाव पाडू शकला नाही. १३ चेंडूत २५ धावा करून त्याने चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर तो झेलबाद झाला. २ चौकार आणि १ षटकार लगावणारा पंत ब्राव्होच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ कॉलिन इन्ग्रॅमदेखील २ धावांवर बाद झाला. ब्राव्होचे एकाच षटकात २ गडी टिपत दिल्लीला चौथा धक्का दिला. किमो पॉलचा जाडेजाने त्रिफळा उडवला आणि दिल्लीला निम्मा संघ तंबूत परतला. पॉलने ४ चेंडू खेळले पण त्याला भोपळा फोडता आला नाही. एकीकडे गडी बाद होताना शिखर धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४५ चेंडूत अर्धशतक गाठले. पण त्यानंतर लगेचच ५१ धावांवर धवन झेलबाद झाला. धवनने ७ चौकार खेचले.

Live Blog

23:45 (IST)26 Mar 2019
अखेरच्या षटकात चेन्नई विजयी; दिल्लीचा ६ गडी राखून पराभव

चेन्नईने शेवटच्या षटकात दिल्लीवर ६ गडी राखून विजय मिळवला. १४८ धावांचे आव्हान त्यांनी २ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले. या बरोबरच चेन्नईने सलग दुसरा सामना जिंकला असून गुणतक्त्यात ते अव्वल स्थानी पोहोचले आहेत.

22:49 (IST)26 Mar 2019
सुरेश रैना माघारी, अमित मिश्राचा दुसरा बळी

डावाला चांगली सुरुवात मिळूनही सुरेश रैनाला मोठी खेळी करता आली नाही. अमित मिश्राच्या गोलंदाजीवर पंतने त्याचा झेल टिपला आणि चेन्नईचा तिसरा गडी माघारी परतला. मिश्राने दुसरा बळी घेतला. रैनाने १६ चेंडूत ३० धावा केल्या. यात त्याने ४ चौकार आणि १ षटकार खेचला.

22:33 (IST)26 Mar 2019
फटकेबाजी करणारा वॉटसन माघारी, पंतने केलं यष्टिचीत

आपल्या कारकिर्दीला साजेशी खेळी करत फटकेबाजी करणारा वॉटसन माघारी परतला. अमित मिश्राच्या गोलंदाजीवर पंतने त्याला यष्टिचीत केले. वॉटसनने ४ चौकार आणि ३ षटकार खेचत ४४ धावा केल्या.

22:09 (IST)26 Mar 2019
रायडू झेलबाद, चेन्नईला पहिला धक्का

चेन्नईसाठी सर्वसाधारणपणे चांगली खेळी करणारा अंबाती रायडू झेलबाद झाला आणि चेन्नईला पहिला धक्का बसला. रायडूने ५ चेंडूत ५ धावा केल्या. यात त्याने १ चौकार लगावला.

21:41 (IST)26 Mar 2019
धवनचे अर्धशतक, ब्राव्होचा तिखट मारा; चेन्नईपुढे १४८ धावांचे आव्हान

शिखर धवनच्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीच्या संघाने चेन्नईपुढे १४८ धावांचे लक्ष्य ठेवले. ब्राव्होने सर्वोत्तम गोलंदाजी करत ४ षटकात ३३ धावा देऊन ३ बळी टिपले.

21:30 (IST)26 Mar 2019
अर्धशतकानंतर धवन झेलबाद, दिल्लीला सहावा धक्का

एकीकडे गडी बाद होताना शिखर धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४५ चेंडूत अर्धशतक गाठले. पण त्यानंतर लगेचच ५१ धावांवर धवन झेलबाद झाला. धवनने ७ चौकार खेचले.

21:24 (IST)26 Mar 2019
जाडेजाने उडवला किमो पॉलचा त्रिफळा; दिल्लीला पाचवा धक्का

नुकताच खेळपट्टीवर आलेल्या किमो पॉलचा जाडेजाने त्रिफळा उडवला आणि दिल्लीला निम्मा संघ तंबूत परतला. पॉलने ४ चेंडू खेळले पण त्याला भोपळा फोडता आला नाही.

21:23 (IST)26 Mar 2019
ब्राव्होचे एकाच षटकात २ गडी; दिल्लीला चौथा धक्का

पंत बाद झाला आणि पाठोपाठ कॉलिन इन्ग्रॅमदेखील २ धावांवर बाद झाला. ब्राव्होचे एकाच षटकात २ गडी टिपत दिल्लीला चौथा धक्का दिला.

21:16 (IST)26 Mar 2019
ऋषभ पंत झेलबाद, दिल्लीला तिसरा धक्का

पहिल्या सामन्यात झंझावाती खेळी करणारा ऋषभ पंत या सामन्यात फारसा प्रभाव पाडू शकला नाही. १३ चेंडूत २५ धावा करून त्याने चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर तो झेलबाद झाला. २ चौकार आणि १ षटकार लगावणारा पंत ब्राव्होच्या गोलंदाजीवर बाद झाला.

20:59 (IST)26 Mar 2019
कर्णधार श्रेयस अय्यर पायचीत, दिल्लीला दुसरा धक्का

कर्णधार श्रेयस अय्यर पायचीत झाला. इम्रान ताहीरने त्याला बाद केले आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. त्याने २० चेंडूत १८ धावा केल्या.

20:22 (IST)26 Mar 2019
पृथ्वी शॉ झेलबाद, दीपक चहरला पहिले यश

दीपक चहरच्या गोलंदाजीवर युवा फलंदाज पृथ्वी शॉ झेलबाद झाला आणि चेन्नईला पहिले यश मिळाले. पृथ्वीने धमाकेदार सुरुवात करत ५ चौकार लगावले होते. पण तो १६ चेंडूत २४ धावा करून बाद झाला.

19:54 (IST)26 Mar 2019
नाणेफेक जिंकून दिल्लीची प्रथम फलंदाजी

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.