News Flash

IPL 2019 : इन्ग्रामच्या षटकारामुळे हुकलं धवनचं शतक; भन्नाट ट्विट्स व्हायरल

इन्ग्राम विजयी षटकार मारल्याने धवनला ९७ धावांवर नाबाद रहावे लागले

IPL 2019 : इन्ग्रामच्या षटकारामुळे हुकलं धवनचं शतक; भन्नाट ट्विट्स व्हायरल

IPL 2019 KKR vs DC : कोलकाताच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकातावर ७ गडी राखून मोठा विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने १७९ धावांचे आव्हान ७ चेंडू राखून पूर्ण केले. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद १७८ धावा केल्या होत्या. मात्र त्यांच्या गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही.

या सामन्यात शिखर धवनने झंझावाती खेळी केली. त्याने एक बाजू लावून धरली. सुरुवातीला पृथ्वी शॉ आणि त्यानंतर ऋषभ पंतच्या साथीने त्याने धमाकेदार खेळी केली. शिखर धवनला आपल्या टी २० कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावण्याची संधी होती. मात्र कॉलिन इन्ग्रामने विजयी षटकार लगावल्याने त्याला ९७ धावांवर नाबाद रहावे लागले. त्यानंतर ट्विटरवर काही मीम्स आणि ट्विट्स भन्नाट व्हायरल झाले.

दरम्यान, १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ झेलबाद झाला आणि दिल्लीला पहिला धक्का बसला. पृथ्वीने १४ धावा केल्या. त्यात २ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. कर्णधार श्रेयस अय्यरने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला. केवळ ६ धावा करून तो माघारी परतला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. शिखर धवनच्या साथीने खेळत ऋषभ पंतने दमदार फटकेबाजी केली. पण अर्धशतकाने त्याला हुलकावणी दिली. तो ४६ धावा करून बाद झाला. पण शिखर धवन ९७ धावा करून नाबाद राहिला. तर कॉलिन इन्ग्रॅमने (१४*) विजयी षटकार लगावला.

त्या आधी, कोलकाताकडून सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळालेला जो डेण्टली पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. इशांत शर्माने उत्कृष्ट स्विंग गोलंदाजी करत त्याला माघारी धाडले. किमो पॉल याच्या गोलंदाजीवर मिळालेल्या ‘फ्री हिट’वर षटकार लगावत कोलकाताने अर्धशतकी मजल मारली. रॉबिन उथप्पाने अचूक फटका खेळत ‘फ्री हिट’चा उपयोग केला. धडाकेबाज सुरुवात मिळालेला रॉबिन उथप्पा उसळत्या चेंडूवर फटका लगावताना झेलबाद झाला. यष्टिरक्षकाने उंच उडी मारून त्याचा अप्रतिम झेल टिपला. उथप्पाने ४ चौकार आणि १ षटकार लगावत ३० चेंडूत २८ धावा केल्या. शुभमन गिल याने अप्रतिम खेळी साकारत दमदार अर्धशतक झळकावले. पण कोलकाताच्या संघाला तो आनंद फार काळ साजरा करता आला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातच नितीश राणा त्रिफळाचीत झाला आणि कोलकाताचा तिसरा गडी माघारी परतला. राणाने १२ चेंडूत ११ धावा केल्या.

अर्धशतक पूर्ण केल्यावर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल झेलबाद झाला आणि कोलकाताला चौथा धक्का बसला. गिलने ३९ चेंडूत दमदार ६५ धावा केल्या. यात ७ चौकार आणि २ षटकार समाविष्ट होते. कर्णधार दिनेश कार्तिक २ धावांवर बाद झाला आणि कोलकाताला पाचवा धक्का बसला. आंद्रे रसलने नेहमीप्रमाणे फटकेबाजी करत ४५ धावा केल्या. यात ३ चौकार आणि २ षटकार खेचले. क्रेग ब्रेथवेट ६ धावांवर बाद झाला.शेवटच्या टप्प्यात पियुष चावलाच्या ६ चेंडूत १४ धावांच्या जोरावर कोलकाताने १७८ धावांपर्यंत मजल मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2019 5:20 pm

Web Title: ipl 2019 kkr vs rr shikhar dhawan reaction to miss century after colin ingram hits six viral memes
टॅग : IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : पंत रमलाय बेबीसिटींगमध्ये, हा व्हिडीओ जरुर पाहा
2 IPL 2019 : मैदानावर पहिलं पाऊल ठेवताच मुंबई इंडियन्सचं द्विशतक
3 IPL 2019 : धोनी क्रिकेटपेक्षा मोठा नाही – बिशन सिंग बेदी
Just Now!
X