IPL 2019 RR vs KXIP : राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या २ संघांमध्ये आजचा सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात ६ धावा करत विंडीजचा तडाखेबाज फलंदाज आणि पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल याने एक नवा इतिहास रचला आहे. त्याने आपल्या डावात ६ धावा करत IPL मध्ये ४ हजार धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा सर्वात जलद पार करण्याचा मान गेलला मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ख्रिस गेल सध्या पंजाब संघाकडून IPL स्पर्धेत खेळत आहे. त्याने गेल्या हंगामात चांगली कामगिरी केली. मात्र लिलाव प्रकियेदरम्यान त्याला कोणीही विकत घ्यायला तयार नव्हते. अखेर पंजाबने तिसऱ्या फेरीत त्याला खरेदी केले आणि गेलने संधीचे सोने केले. त्यामुळे यंदाच्या हंगामात त्याला संघात कायम ठेवण्यात आले.

दरम्यान,या सामन्यात चेंडूत फेरफार केल्याप्रकरणी एका वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्स संघातून पुनरागमन करत आहेत. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. चेंडूत फेरफार केल्याच्या आरोपावरून बंदीची शिक्षा भोगणारा डेव्हिड वॉर्नर याने IPL मध्ये दमदार पुनरागमन केले. त्यामुळे स्मिथही त्याचीच पुनरावृत्ती करणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपूर्वी लयीत परतण्यासाठी स्मिथकरिता यंदाची आयपीएल अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे वॉर्नरप्रमाणेच तडाखेबंद खेळी करून पुनरागमन करण्यास तो उत्सुक असेल. बंदीनंतर स्मिथ बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळला होता. मात्र कोपराला दुखापत झाल्याने त्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले होते. आता शस्त्रक्रियेनंतर सज्ज झालेल्या स्मिथसमोर पुन्हा लयीत परतण्याचे आव्हान असणार आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि जोस बटलर ही राजस्थानची बलस्थाने आहेत. मात्र ते २५ एप्रिलनंतर मायदेशी परतणार आहे. त्याआधीच त्यांचा उत्तम वापर करून बाद फेरी गाठण्यासाठी भक्कम पायाभरणी करण्याचे ध्येय राजस्थानला साध्य करून घ्यावे लागणार आहे. स्टोक्स हा फलंदाजी आणि गोलंदाजीत राजस्थानचा मौल्यवान खेळाडू ठरू शकतो.

पंजाबला अष्टपैलू सॅम कुरन याच्याकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा आहे. पंजाबकडे मोहम्मद शमी, अ‍ॅण्ड्रय़ू टाय, मुजीब उर रहमान, जयदेव उनाडकट, वरुण आरोन, धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर आणि ईश सोधी हे गोलंदाजीत दमदार पर्याय आहेत. तसेच कर्णधार रवीचंद्रन अश्विनचा फिरकी मारा हा पंजाबच्या गोलंदाजीचा कणा राहणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 kxip batsman chris gayle completes 4000 runs mark becomes fastest to reach mark
First published on: 25-03-2019 at 20:30 IST