18 February 2020

News Flash

IPL 2019 Final : विजेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स कोट्यधीश, खेळाडूही मालामाल

अटीतटीच्या लढतीत चेन्नईवर एका धावाने मात

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे चेन्नई सुपरकिंग्जवर मात करत एका धावाने सामन्यात बाजी मारली. आयपीएलमधलं मुंबईचं हे चौथ विजेतेपद ठरलं. पहिल्या ३ षटकात खोऱ्याने धावा देणाऱ्या मलिंगाने अखेरच्या षटकात आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत मुंबईला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकूरचा बळी घेतल्यानंतर, सर्व मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी मैदानात येत जल्लोष केला.

या विजयानंतर मुंबई इंडियन्स संघाला बीसीसीआयतर्फे भरघोस इनामही घोषित करण्यात आलं आहे. चौथं विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबईला २० कोटी तर उप-विजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला १२.५ कोटी रुपयांचं इनाम जाहीर करण्यात आलं आहे. याचसोबत सर्वाधिक धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला आँरेज कॅपचा बहुमान आणि १० लाख तर सर्वाधिक बळी घेणाऱ्या इम्रान ताहीरला पर्पल कॅपच्या बहुमानासह १० लाखांचं इनाम जाहीर करण्यात आलं. ताहीरने संपूर्ण हंगामात २६ बळी घेतले, तर डेव्हिड वॉर्नरने ६९२ धावा केल्या.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात अन्य पुरस्कार मिळवणारे महत्वाचे खेळाडू –

मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर – आंद्रे रसेल

सर्वोत्कृष्ट खेळपट्टी आणि मैदान – अनुक्रमे पंजाब व हैदराबाद

फेअरप्ले अवॉर्ड – सनराईजर्स हैदराबाद

परफेक्ट कॅच ऑफ सिझन – कायरन पोलार्ड

सुपर स्ट्राईकर – आंद्रे रसेल

स्टाईलिश प्लेअर ऑफ सिझन – लोकेश राहुल

गेमचेंजर ऑफ सिझन – राहुल चहर

First Published on May 13, 2019 1:20 am

Web Title: ipl 2019 orange cap purple cap mvp emerging player complete list of winners
Next Stories
1 Video : शार्दूल ठाकूरने घेतलेला हा अफलातून झेल पाहिलात का?
2 IPL 2019 Final : चाळीशीतल्या इम्रान ताहीरचा अनोखा विक्रम
3 Video : हार्दिक पांड्याचा सणसणीत हेलिकॉप्टर शॉट, धोनीही झाला अवाक
Just Now!
X