27 September 2020

News Flash

IPL 2019 : सेहवागला मागे टाकून ऋषभ पंत ठरला षटकारांचा बादशहा

राजस्थानविरुद्ध सामन्यात पंतचं अर्धशतक

आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने बाद फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. तब्बल ७ वर्षांनी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करणाऱ्या दिल्लीने यंदा आपल्या संघात महत्वाचे बदल केले होते. शनिवारी राजस्थानविरुद्ध आपल्या अखेरच्या सामन्यातही दिल्लीने विजय मिळवत साखळी फेरीची सांगता विजयाने केली. दिल्लीचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, त्याने नाबाद अर्धशतक झळकावलं.

३८ चेंडूत नाबाद ५३ धावांची धडाकेबाज खेळी करणाऱ्या ऋषभने विरेंद्र सेहवागला मागे टाकलं आहे. त्याच्या या झंजावाती खेळीत २ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. दिल्ली संघाकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋषभ पंत पहिल्या क्रमांकावर आला आहे. पंतने सेहवागचा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

दिल्लीकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज –

ऋषभ पंत – ८८ षटकार

विरेंद्र सेहवाग – ८५ षटकार

श्रेयस अय्यर – ६७ षटकार

पंतने आयपीएलमध्ये २०१६ ला दिल्ली संघाकडून पदार्पण केले. तेव्हापासून त्याने आत्तापर्यंत दिल्लीकडून खेळताना ८८ षटकार मारले आहेत. या हंगामात ऋषभ पंतने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 3:13 pm

Web Title: ipl 2019 rishabh pant breaks virendra sehwag record
टॅग IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : फक्त १६ धावा… तरीही विराटचा विक्रमांचा ‘डबल धमाका’
2 IPL 2019 : हेटमायर-गुरकीरत जोडीने केला कोणालाही न जमलेला विक्रम
3 सचिन तेंडुलकरची बॅट आणि आफ्रिदीचं ३७ चेंडूतलं शतक… जाणून घ्या कनेक्शन
Just Now!
X