News Flash

Video : डेव्हिड वॉर्नरचा IPL २०१९ ला भावनिक निरोप

शेवटच्या सामन्यात त्याने केली ५६ चेंडूत ८१ धावांची खेळी

IPL 2019 SRH vs KXIP : हैदराबादच्या संघाने पंजाबवर ४५ धावांनी विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नरच्या तुफानी ८१ धावांच्या खेळीच्या बळावर हैदराबादने पंजाबपुढे २१३ धावांचे विशाल आव्हान ठेवले होते. पण राहुलच्या (७९) अर्धशतकाच्या जोरावर पंजाबचा संघ ८ बाद १६७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. रशीद आणि खलीलने ३-३ बळी टिपले पंजाबचा हा गेल्या सहा सामन्यातील पाचवा पराभव ठरला. पण आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या वॉर्नरने मात्र सामना गाजवला. त्याने ५६ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

विश्वचषकाच्या तयारीसाठी वॉर्नर आणि इतर महत्वाचे ऑस्ट्रेलियन खेळाडू यांना मायदेशी परतायचे आहे. त्यामुळे वॉर्नरचा हा यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना होता. पण या सामन्यानंतर वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून IPL ला भावनिक निरोप दिला. ‘सनरायझर्स हैदराबाद या संघाने मला खूप पाठिंबा दिला. त्यांनी मला दिलेल्या पाठींब्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे. केवळ याच वर्षी नव्हे तर गेल्या वर्षीही त्यांनी मला खचू दिले नाही. IPL मध्ये या संघाकडून खेळण्यासाठी मला वाट पहावी लागली. पण मी या संघात खेळलो आणि माझी १०० टक्के कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. या संघाचे संघमालक, सहाय्यक खेळाडू, संघ सहकारी, सोशल मीडिया टीम आणि चाहते या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला होता, तो विश्वास मी सार्थ ठरवलं याचा मला आनंद आहे. हैदराबादच्या संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा’, असा भावनिक संदेश त्याने लिहिला आहे.

दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्यात २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेल फटकेबाजीच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. त्याने ३ चेंडूत एका चौकारासह ४ धावा केल्या. त्यानंतर भागीदारी होत असतानाच मयंक अग्रवाल बाद झाला. त्याने १८ चेंडूत २७ धावा केल्या. फटकेबाजी करणारा धोकादायक फलंदाज निकोलस पूरन झेलबाद झाला. त्याने १० चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २१ धावा केल्या. डेव्हिड मिलरने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण रशीद खानने आधी डेव्हिड मिलर आणि नंतर पंजाबचा कर्णधार अश्विन असे २ चेंडूत २ बळी टिपले. मिलरने ११ चेंडूत ११ धावा केल्या, तर अश्विन पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.

एकीकडे गडी बाद होत असताना लोकेश राहुलने मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर सलग २ षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केले. लोकेश राहुल राहुल ७९ धावांवर बाद झाला. इतर कोणीही जबाबदारीने फलंदाजी केली नाही. त्यामुळे पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले.

त्याआधी आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी वृद्धीमान साहासोबत ७८ धावांची भागीदारी केली. साहा (२८) माघारी परतल्यानंतर वॉर्नरने मनिष पांडेच्या साथीने डावाला पुन्हा एकदा आकार दिला. दोन्ही खेळाडूंची पंजाबची गोलंदाजी व्यवस्थित खेळून काढत धावफलक हलता ठेवला. या दरम्यान वॉर्नरने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. त्याने ५६ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. रविचंद्रन आश्विनने पांडेला (३६) माघारी धाडत हैदराबादची जमलेली जोडी फोडली.

यानंतर डेव्हिड वॉर्नरही माघारी परतला. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी यावेळी आपली जबाबदारी ओळखत फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. पंजाबच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पंजाबकडून रविचंद्रन आश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी २-२ फलंदाजांना माघारी धाडलं. त्यांना अर्शदीप सिंह आणि मुरगन आश्विनने १ बळी घेत चांगली साथ दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 9:47 pm

Web Title: ipl 2019 video david warner post emotional goodbye message on social media for ipl
टॅग : IPL 2019
Next Stories
1 IPL चं नाणं विराटवर नाराज! जाणून घ्या आकडेवारी
2 IPL 2019 RCB vs RR : पावसाने काढली बंगळुरूची ‘विकेट’; सामना अनिर्णित
3 IPL 2019 : दिल्लीच्या खेळाडूंचा मला अभिमान – गांगुली
Just Now!
X