News Flash

IPL 2020 : न्यूझीलंडचा गोलंदाज करणार राजस्थान रॉयल्सच्या फिरकीपटूंना मार्गदर्शन

संघ प्रशासनाने केली घोषणा

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने आश्चर्यचकीत करणारी घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा फिरकीपटू इश सोधी आगामी हंगामात राजस्थान रॉयल्सच्या फिरकीपटूंना मार्गदर्शन करणार आहे. राजस्थान रॉयल्स संघप्रशासनाने याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे.

इश सोधीने याआधीही राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आठ सामन्यांत इश सोधीने ६.६९ च्या सरासरीने ९ बळी घेतले आहेत. २०२० च्या लिलावाआधी राजस्थानने इश सोधीला करारमुक्त केलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, तेराव्या हंगामाच्या लिलावासाठी इश सोधीवर कोणत्याही संघमालकाने बोली लावली नव्हती. गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांच्यासोबत गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याचं काम सोधीकडे असणार आहे. त्यामुळे सोधी आपल्या नवीन भूमिकेत कसं काम करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा –  IPL 2020 : बॉलबॉय ते थेट दिल्ली कॅपिटल्सचं तिकीट, वाचा मुंबईच्या तुषार देशपांडेची यशोगाथा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 4:21 pm

Web Title: ipl 2020 rajasthan royals rope in ish sodhi as spin consultant psd 91
टॅग : IPL 2020,Rr
Next Stories
1 IPL 2020 : बॉलबॉय ते थेट दिल्ली कॅपिटल्सचं तिकीट, वाचा मुंबईच्या तुषार देशपांडेची यशोगाथा
2 Video : …अन् गोलंदाजानेच केला धोनी-स्टाईल रन-आऊट
3 तुमच्या आठवणी मनात सदैव राहतील! आचरेकर सरांच्या आठवणींनी सचिन झाला भावूक
Just Now!
X