दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनं करोनावर मात करत संघात पुनरागमन केलं आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. करोनावर मात केल्यानंतर तो दिल्लीच्या ताफ्यात रुजू झाला आहे.

अक्षर पटेल गेल्या २८ मार्चला संघात सहभागी झाला होता. करोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्याला बायो बबलमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मात्र ३ एप्रिलला केलेल्या चाचणीत त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्याला करोनाची साधी लक्षणं दिसत होती. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला पुढील तपासणीसाठी पाठवलं होतं. तिथे अक्षर पटेलवर तीन आठवडे यशस्वी उपचार केले. आता करोनावर मात करुन अक्षर पटेल पुन्हा एकदा संघात सहभागी झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

“बापू (अक्षर पटेल) दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सहभागी झाला आहे. तो आल्याने सर्वजण आनंदी आहेत”, असं ट्वीट दिल्ली कॅपिटल्सने केलं आहे. ‘माणसं बघून मला मजा येत आहे’, असं अक्षर पटेल व्हिडिओत सांगताना दिसत आहे.

IPL 2021: देवदत्तला सूर गवसला; राजस्थान विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी

आयपीएल स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या देवदत्त पडिक्कल याला करोनची लागण झाली होती. त्यानंतर अक्षर पटेलला करोनाची लागण झाली. अक्षरच्या गैरहजेरीत दिल्लीनं मुंबईच्या शम्स मुलानी याला संघात स्थान दिलं होतं.