News Flash

IPL 2021: राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स; यष्टीरक्षक कर्णधार आमनेसामने

दिल्ली विजयी घोडदौड कायम ठेवणार?

(संग्रहित छायाचित्र)

आयपीएलमध्ये दोन तरुण यष्टीरक्षक कर्णधार आमनेसामने येणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रंगणार आहे. दिल्लीचं कर्णधारपद ऋषभ पंतकडे आहे. तर राजस्थानचं कर्णधारपद संजू सॅमसनच्या हाती आहे. दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच आयपीएलमध्ये टीमचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी दोघांचा प्रयत्न असणार आहे. दिल्लीने यापूर्वी जबरदस्त कामगिरी करत धोनीच्या चेन्नईला पराभूत केलं आहे. राजस्थान रॉयल्सचा पंजाबविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात निसटता पराभव झाला आहे. मात्र संजू सॅमसनच्या आक्रमक खेळीचा इतर संघांनी धसका घेतला आहे. संजूने यंदाच्या आयपीएलमधील पहिलं शतक झळकावलं आहे.

राजस्थान रॉयल्सला जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या सामन्यात फटका बसला. आता अष्टपैलू बेन स्टोक्स दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्यामुळे डेविड मिलर किंवा लियम लिविंगस्टोनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Video: चिडलेल्या कोहलीने बॅटने उडवली खुर्ची, IPL च्या आचारसंहितेचा भंग; मॅच रेफ्रींनी फटकारलं

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने आपला पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे दिल्ली आपल्या संघात फारसा बदल करणार नाही. मात्र वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर एनरिच नोर्त्जेला करोनाची लागण झाल्याने त्याला संघात स्थान मिळण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज; तिसरं नाव वाचून आश्चर्य वाटेल!

आयपीएल २०२१ मधला हा सातवा सामना आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाली ७.३० वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. आयपीएल गुणतालिकेत दिल्लीचा संघ दूसऱ्या स्थानी आहे. तर राजस्थानचा संघ सहाव्या स्थानावर आहे.

दोन्ही संघातील संभाव्य ११ खेळाडू
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), मनन वोहरा, जोस बटलर, लियम लिविंगस्टोन, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमेयर, ख्रिस वॉक्स, आर. अश्विन, आवेश खान, कागिसो रबाडा/ टॉम करन, अमित मिश्रा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 2:45 pm

Web Title: ipl 2021 delhi capitals vs rajasthan royals match on wankhede stadium rmt 84
Next Stories
1 Video: चिडलेल्या कोहलीने बॅटने उडवली खुर्ची, IPL च्या आचारसंहितेचा भंग; मॅच रेफ्रींनी फटकारलं
2 नव्या दमाच्या कर्णधारांची झुंज!
3 RCB vs SRH : बंगळुरूने हैदराबादकडून हिसकावला विजयाचा घास!
Just Now!
X