News Flash

IPL 2021 : चेन्नईत विजयाची गुढी उभारण्यासाठी मुंबई सज्ज

आज आयपीएलमध्ये कोलकाता वि. मुंबई रंगणार सामना

मुंबई इंडियन्स

चेन्नईचे एम. ए. चिदम्बरम स्टेडियम पुन्हा एकदा रंगतदार सामन्यासाठी सज्ज झाले आहे. आज या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन संघ आमने सामने असतील. क्वारंटाइन कालावधीमुळे मुंबईचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डि कॉक आयपीएल 2021च्या उद्घाटनाच्या सामन्यात खेळू शकला नव्हता, पण तो आता संघात सामील झाला आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबईला 2 गड्यांनी मात दिली. त्यामुळे आज मुंबईचा संघ चेन्नईत विजयाची गुढी उभारतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मुंबई संघात क्विंटन डि कॉकच्या समावेशामुळे ख्रिस लिनला बाहेर बसावे लागू शकते. लिनने आरसीबीविरुद्ध चांगली फलंदाजी केली होती. पण, दोघांपैकी एकाची सलामीसाठी निवड होणार आहे. आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या घातक स्पेलसमोर मुंबईच्या फलंदाजांची मधली फळी अपयशी ठरली. हर्षलने 27 धावात 5 बळी घेत मुंबईला धक्का दिला. मात्र, हीच चूक सुधारण्यासाठी ते आज प्रयत्नशील ठरतील. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांना केकेआरच्या फलंदाजांवर लगाम घालण्याचे आव्हान असेल.

दुसरीकडे, कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर मात दिली. नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक आणि कर्णधार ईऑन मॉर्गन हे फलंदाज मधल्या फळीत मुंबईविरुद्ध खोऱ्याने धावा काढू शकतात.

मागील 12 सामन्यात केकेआरला मुंबईविरुद्ध फक्त 1 विजय मिळवता आला आहे. तर, आयपीएलमध्ये त्यांनी मुंबईविरुद्ध 6 सामने जिंकले आहेत आणि 21 सामन्यात पराभव पत्करला आहे.

संघ

कोलकाता : शुबमन गिल, नितीश राणा, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ईऑन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्युसन, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, संदीप वारियर, प्रसिध कृष्णा, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, हरभजन सिंग, बेन कटिंग, व्यंकटेश अय्यर, पवन नेगी.

मुंबई : रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, मोहसिन खान, हार्दिक पंड्या, जयंत यादव, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, सुचित रॉय, ईशान किशन, क्विंटन डि कॉक, आदित्य तरे, अ‍ॅडम मिलने, नॅथन कुल्टर नाईल, पीयुष चावला, जेम्स नीशम, युधवीर चरक, मार्को जानसेन, अर्जुन तेंडुलकर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 5:16 pm

Web Title: ipl 2021 mi vs kkr match preview adn 96
Next Stories
1 ‘‘…तर, वर्ल्डकपसाठी हरभजनची भारतीय संघात निवड व्हावी’’
2 चेतन साकारियाच्या संघर्षाबद्दल सेहवागने केले भावनिक ट्विट
3 मुंबई इंडियन्सकडून चाहत्यांना गुढी पाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा
Just Now!
X