आयपीएल 2021चा तिसरा सामना आज कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चेन्नईमध्ये खेळला जाईल. सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत आयपीएलचे एकदा विजेतेपद जिंकले आहे, तर केकेआरने दोन विजेतेपदे नावावर केली आहेत. कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ दिसत असून हा सामना रोमांचक होणे अपेक्षित आहे.

गेल्या 5 वर्षांपासून हैदराबाद संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला आहे, तर केकेआरचा संघ गेल्या मोसमात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. मागील वर्षी झालेल्या लिलावात केकेआरने शाकिब अल हसन आणि बेन कटिंग यांना संघात घेतले आहे. त्यामुळे आंद्रे रसेल आणि सुनील नरिन या खेळाडूंवरचा दबाव कमी होईल. दिनेश कार्तिकचा मागील हंगामातील फॉर्म चांगला नव्हता.

दुसरीकडे, हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर केकेआरविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात प्रयत्नशील असेल. त्याच्यासोबत धडाकेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टो सलामी देईल. आयपीएलच्या इतिहासात सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम या दोघांच्या नावावर आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त आहे. याशिवाय टी. नटराजन, राशिद खान, केदार जाधव आणि जेसन होल्डर यांच्या उपस्थितीमुळे हैदराबादची टीम बरीच मजबूत दिसत आहे.

कशी असेल खेळपट्टी

चेन्नईच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. चेन्नईची खेळपट्टी नेहमी फिरकीपटूंना मदत करते. इथल्या खेळपट्टीवर, चेंडू जुना झाल्यावर फलंदाजांना अडचण येऊ शकते. पण, रात्रीच्या सामन्यांसाठी दवामुळे फलंदाजांना खेळपट्टी मदत करू शकते. अशा परिस्थितीत टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो.

संभाव्य प्लेईंग XI

सनरायझर्स हैदराबाद- डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, प्रियम गर्ग, वृद्धीमान साहा, अभिषेक शर्मा, जेसन होल्डर, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी नटराजन, शाहबाज नदीम.

कोलकाता नाइट रायडर्स – ईयॉन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, सुनील नरिन, नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि प्रसिद्ध कृष्णा.