IPL च्या बाराव्या हंगामातील लिलाव आज जयपूरमध्ये सुरु आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस ही स्पर्धा होणार आहे. २०१९ साली होणाऱ्या विश्वचषकामुळे अनेक महत्वाच्या खेळाडूंनी यंदा आयपीएलकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. पण विंडीजचा संघ भारतात दुस्र्यासाठी आलेला असताना आपल्या फटकेबाजीने छाप उमटवणाऱ्या शिमरॉन हेटमायरला या लिलावात ४.२० कोटींना घेण्यात आले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर अखेरच्या क्षणात मात करुन बंगळुरुने हेटमायरला आपल्या संघात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

जाणून घ्या कोण आहे ४.२० कोटींना खरेदी केलेला शिमरॉन हेटमायर</strong>

हेटमायरने विंडीजचा भारत दौरा चांगलाच गाजवला होता. विंडीजच्या संघाकडून खेळताना हेटमायरने पहिल्या वन – डे सामन्यात शतक झळकावले होते. ६ चौकार आणि ६ षटकार लगावत त्याने आपली १०४ धावांची खेळी सजवली होती. तर दुसऱ्या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ९४ धावा केल्या होत्या. ६४ चेंडूत त्याने ४ चौकार आणि ७ षटकार खेचत ही खेळी केली होती.  मात्र त्यानंतरच्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl auction 2019 shimron hetmyer sold to rcb
First published on: 18-12-2018 at 16:23 IST