03 August 2020

News Flash

इशांत, चंडिमलवर एका सामन्याची बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी इशांत शर्मा आणि दिनेश चंडिमल यांच्यावर एका आंतरराष्ट्रीय सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.

| September 2, 2015 12:53 pm

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी इशांत शर्मा आणि दिनेश चंडिमल यांच्यावर एका आंतरराष्ट्रीय सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. धम्मिका प्रसाद आणि लहिरु थिरिमाने यांच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे.
बंदीच्या शिक्षेमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी २ नोव्हेंबरपासून मोहाली येथे होणार आहे. दुसरीकडे चंडिमल वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही.
चौथ्या दिवशी इशांत फलंदाजी करत असताना त्याचे आणि धम्मिका प्रसाद, दिनेश चंडिमल यांचे भांडण झाले होते. त्यांच्यातला वाद मिटवण्यासाठी पंचांना हस्तक्षेप करावा लागला होता. इशांत शर्माने या सामन्यात बळी मिळवत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र बेशिस्त वर्तनामुळे या कामगिरीला गालबोट लागले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात इशांत खेळू शकणार नसल्याने भारताचे आक्रमण कमकुवत झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2015 12:53 pm

Web Title: ishant sharma dinesh chandimal handed one match bans
टॅग Ishant Sharma
Next Stories
1 क्रीडा मंत्रालयाच्या प्राधान्य क्रीडा प्रकारात योगा खेळास स्थान
2 आशियाई बॉक्सिंग स्पर्धा : शिवा, विकास आणि देवेंद्रो चमकले
3 सचिन तेंडुलकर आमचा देव- धोनी
Just Now!
X