२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला संघात संधी दिली. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून आगामी सर्व मालिकांसाठी पंत हा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल असं निवड समितीने स्पष्ट केलं होतं. मात्र, विंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर पंतला अपयशाचा सामना करावा लागला. कित्येकदा मैदानात चाहत्यांनी पंत बाद झाल्यानंतर धोनी…धोनीचा गजर करत ऋषभची हुर्यो उडवली होती. पंत आणि धोनीमध्ये होणाऱ्या तुलनेवर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आपलं मत व्यक्त केलं आहे.

“पंतसाठी एका अर्थाने हे चांगलंच आहे, त्याला आता याची सवय व्हायला हवी. ज्यावेळी चाहते मैदानात आपली हुर्यो उडवत असतात तो आवाज त्याला ऐकू दे आणि त्यामधूनच त्याला मार्ग काढू दे. तो सध्या दबावाखाली आहे आणि त्याला मोकळं सोडणं गरजेचं आहे…यामधून बाहेर पडण्यासाठी तो स्वतः रस्ता शोधेल. धोनीची बरोबरी करण्यासाठी ऋषभ पंतला किमान १५ वर्ष लागतील.” गांगुली पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी संघात केवळ एक जागा शिल्लक!! कर्णधार विराटचे सूचक संकेत

भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनीही पंतची धोनी आणि साहाशी होणारी तुला योग्य नसल्याचं म्हटलं होतं. सलग अपयशी झाल्यानंतरही भारतीय संघ व्यवस्थापनाने पंतला विंडीजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलेलं आहे. त्यामुळे या मालिकेत त्याची कामगिरी कशी होतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : भाजपा खासदार दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहमालक होण्याच्या तयारीत