कोलकाता नाइट रायडर्स आणि भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला करोनाची लागण झाली आहे. करोनाचा संसर्ग झालेला तो कोलकाता नाईट रायडर्सचा तो चौथा खेळाडू आहे.
Varun Chakravarthy, Sandeep Warrier and Tim Seifert are the other KKR players, who tested positive earlier.https://t.co/lTVxSlz5kD
— Express Sports (@IExpressSports) May 8, 2021
यापूर्वी वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि टिम सेफर्ट हे करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आयसीसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौर्यासाठी कृष्णाची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
टिम सेफर्टला करोनाची लागण
प्रसिध कृष्णापूर्वी, न्यूझीलंड संघाचा आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज टिम सेफर्टला करोनाची लागण झाली आहे. या संक्रमणामुळे तो न्यूझीलंडला जाऊ शकला नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याविषयी माहिती दिली. करोनाची लागण झाल्यामुळे सेफर्ट उर्वरित सदस्यांसोबत न्यूझीलंडला जाऊ शकला नाही. तो अहमदाबादमध्ये आयसोलेशनमध्ये राहणार असून त्याला चेन्नईला पाठवले जाईल. तेथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जातील.
करोना विषाणूमुळे आयपीएलचा १४वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन थांबवण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृध्दिमान साहा करोना पॉझिटिव्ह आढळले आणि त्यानंतर आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.