2018 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी चांगलं गेलेलं आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना भारतीय संघाने आपला वरचष्मा कायम राखला आहे. मात्र परदेश दौऱ्यांमध्ये भारतीय संघाला फारसं यश हाती लागलं नाही. 2018 साली अखेरीस सुरु झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करतो आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. 2019 साली भारतीय संघाला जास्तकरुन परदेश दौरे करावे लागणार आहेत. याचसोबत यंदाच्या वर्षात विश्वचषक आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होत असल्यामुळे भारतीय संघासाठी हे वर्ष अत्यंत महत्वाचं असणार आहे.

2019 सालात भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल –

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (1 कसोटी आणि 3 वन-डे)

3 ते 7 जानेवारी (चौथी कसोटी, सिडनी)

12 जानेवारी (पहिला वन-डे सामना, सिडनी)

15 जानेवारी (दुसरा वन-डे सामना, अॅडलेड)

18 जानेवारी (तिसरा वन-डे सामना, मेलबर्न)

——————————————————————————

भारताचा न्यूझीलंड दौरा (5 वन-डे आणि 3 टी-20)

23 जानेवारी (पहिला वन-डे सामना, नेपियर)

26 जानेवारी (दुसरा वन-डे सामना, बे ओव्हल)

28 जानेवारी (तिसरा वन-डे सामना, बे ओव्हल)

31 जानेवारी (चौथा वन-डे सामना, हॅमिल्टन)

3 फेब्रुवारी (पाचवा वन-डे सामना, वेलिंग्टन)

6 फेब्रुवारी (पहिला टी-20 सामना, वेलिंग्टन)

8 फेब्रुवारी (दुसरा टी-20 सामना, ऑकलंड)

10 फेब्रुवारी (तिसरा टी-20 सामना, हॅमिल्टन)

—————————————————————————-

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (5 वन-डे आणि 2 टी-20)

24 फेब्रुवारी (पहिला वन-डे सामना, मोहाली)

27 फेब्रुवारी (दुसरा वन-डे सामना, हैदराबाद)

2 मार्च (तिसरा वन-डे सामना, नागपूर)

5 मार्च (चौथा वन-डे सामना, दिल्ली)

8 मार्च (पाचवा वन-डे सामना, रांची)

10 मार्च (पहिला टी-20 सामना, बंगळुरु)

13 मार्च (दुसरा टी-20 सामना, विशाखापट्टणम)

झिम्बाब्वेचा भारत दौरा – तब्बल 15 वर्षांनी झिम्बाब्वेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 1 कसोटी सामना आणि 3 वन-डे सामने खेळणार आहे. या दौऱ्याचं वेळापत्रक अजुनही निश्चीत झालेलं नाहीये. मात्र मार्च महिन्याच्या अखेरीस सुरु होणारी आयपीएल स्पर्धा लक्षात घेता झिम्बाब्वेचा हा दौरा रद्द केला जाऊ शकतो अथवा कसोटी आणि वन-डे सामन्यांऐवजी फक्त टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाऊ शकते.

—————————————————————————-

इंडियन प्रिमीअर लिग 2019 – मार्च 29 ते मे 19 ( अंदाजे वेळापत्रक, तारीख अजुन निश्चीत झालेली नाही)

आयसीसीसी विश्वचषक 2019 – 30 मे ते 14 जुलै (इंग्लंड)

—————————————————————————-

कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (भारतीय संघाचा विंडीज दौरा)

विश्वचषकानंतर भारतीय संघ लगेच विंडीज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 2 कसोटी 3 वन-डे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यातील 2 कसोटी सामने हे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहे. मात्र उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक विंडीज क्रिकेट बोर्डाने अद्याप जाहीर केलेलं नाहीये.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा)

विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघाला एका महिन्याची विश्रांती मिळणार आहे. यानंतर भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर 2020 साली आफ्रिकेचा संघ भारतात मर्यादीत षटकांच्या सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे.

————————————————————————-

कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (बांगलादेशचा भारत दौरा)

दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर बांगलादेशशी दोन हात करणार आहे. या दौऱ्यात भारत 2 कसोटी सामने आणि 3 टी-20 सामने खेळेल. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका ही भारताची या वर्षातली अखेरची कसोटी मालिका असणार आहे.

विंडीजचा भारत दौरा – 2019 सालच्या अखेरीस विंडीजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 वन-डे आणि 3 टी-20 सामने खेळेल. या दौऱ्याचं वेळापत्रक अद्याप जाहीर केलेलं नाहीये.