18 September 2020

News Flash

महेश भुपतीच्या मेहनतीवर लारा दत्ताचं ‘पाणी’

पावसाचं पाणी अडवायला वापरले ग्रँडस्लॅम स्पर्धेचे टॉवेल

लारा दत्ता आणि महेश भुपती ( संग्रहीत छायाचित्र )

नवरा आणि बायकोमधलं नातं हे मित्रासारखं असावं असं म्हणलं जातं. कित्येकदा अनवधानाने किंवा जाणुनबुजून बायको नवऱ्याच्या नकळत अशा काही गोष्टी करुन बसते की ज्याचा नंतर समस्त नवरोबांना त्रास सहन करावा लागतो. भारताचा माजी टेनिसपटू महेश भुपतीलाही आपली पत्नी लारा दत्ताच्या अशाच एका कामगिरीचा त्रास सहन करावा लागला आहे.

मंगळवारी सकाळपासून मुंबईत पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वेही ठप्प या पावसामुळे ठप्प पडली. महेश भुपतीची पत्नी लारा दत्तालाही या पावसाचा चांगलाच त्रास सहन करावा लागला. पावसाचं पाणी आपल्या घरात येऊ नये यासाठी लाराने आपला पती महेश भुपतीच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांमधले टॉवेल आणि इतर सामग्रीचा वापर केला. यानंतर लाराने याचा फोटो काढत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला.

साहजिक हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर भुपतीची प्रतिक्रिया काय असेल याचा तुम्ही विचार करुच शकता.

काही मिनीटातचं हा प्रकार ट्विटरवर व्हायरल व्हायला लागला. अनेक मान्यवर व्यक्तींसह नेटीझन्सनी यावरुन लारा दत्ताचं ट्रोलिंग करायला सुरुवात केलं. त्यामुळे बायकांच्या मनात नेमकं काय चाललं असतं याचा अंदाज जिथे ब्रह्मदेवाला बांधता आला नाही, तिकडे महेश भुपतीची काय कथा??

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 11:09 pm

Web Title: lara dutta use her husband mahesh bhupati grand slam competition towel to prevent rain water coming in home
Next Stories
1 पदार्पणातच बॉक्सर गौरव बिधुरीची चमक, जागतिक स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक
2 पुणेरी पलटणचा संघ कसबा गणपतीच्या दर्शनाला
3 सरदार सिंह, देवेंद्र झाजरिया खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
Just Now!
X