01 March 2021

News Flash

मुंबईकर पृथ्वी शॉची मास्टर ब्लास्टरकडून स्तुती

'तरूण खेळाडूंनी फक्त क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटावा'

भारतीय संघ हा अत्यंत संतुलित आहे. त्यामुळे २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल, असे मत मास्टर ब्लास्टर सचिनने व्यक्त केले होते. त्यानंतर आता भारतीय संघातील युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांची सचिनने स्तुती केली आहे.

पृथ्वी शॉ

 

पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे दोघे तरुण आणि तडफदार खेळाडू आहेत. या दोघांमध्ये खूप प्रतिभा आहे. त्यांच्यात प्रचंड क्षमता आहे. पृथ्वी शॉ टीम इंडियात खेळणार याचा मला आधीच अंदाज होता. तो आठ-नऊ वर्षांचा होता, तेव्हापासून मी त्याला खेळताना पाहिले आहे. त्याच्यात काहीतरी विशेष होते आणि तो भविष्यात भारतीय संघाकडून खेळेल, असे मी आधीच म्हणालो होतो, असे सचिन म्हणाला.

शुभमन गिल

 

शुभमन गिलबाबत बोलताना तो म्हणाला की शुभमनने गेल्या वर्षी १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. स्थानिक क्रिकेटमध्येदेखील त्याने उत्तम खेळ करून दाखवला आहे. याच बळावर त्याला टीम इंडियातही स्थान मिळाले आहे. या दोघांमध्ये चांगला खेळ करून दाखवण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे त्यांनी फक्त क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटावा, असेही सचिन म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 3:45 pm

Web Title: master blaster sachin tendulkar says prithvi shaw and shubman gill have huge potential in cricket
Next Stories
1 #10yearschallange मुंबई ते विदर्भ – वासिम जाफरचा फॉर्म कायम
2 IND vs NZ : निवृत्त होऊनही मॅक्युलमचा भारताच्या पराभवात मोठा हात
3 विदर्भाच्या विजयात आदित्य सरवटे चमकला, दिग्गज फिरकीपटूंच्या यादीत स्थान
Just Now!
X