News Flash

MI Vs RCB: आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ‘या’ ५ खेळाडुंचं पदार्पण

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून 'या' खेळाडुला पहिल्यांदा संधी

आयपीएल संघात निवड झाली तरी अंतिम ११ खेळाडुंमध्ये खेळण्याचं स्वप्न युवा क्रिकेटपटू उराशी बाळगून असतात. युवा क्रिकेटपटूंना आपलं कर्तृत्व दाखवण्याची एक नामी संधी असते. त्यामुळे भविष्यातील सर्व योजना आखता येतात. मात्र नवोदित आणि गेलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी खेळाडुंना ११ खेळाडुंमध्ये मैदानात कर्तृत्व दाखवण्याची एक संधी मिळणं गरजेचं असतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नवोदित खेळाडू रजत पाटिदार याला संधी दिली आहे. रजत पाटिदारला आरसीबीने आयपीएल लिलावात २० लाख रुपयात खरेदी केले होते. रजत फलंदाजीसोबत क्षेत्ररक्षणातही तरबेज आहे. पाटिदार मध्य प्रदेशकडून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो. रजतने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २२५३ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.

ग्लेन मॅक्सवेल आणि डॅनियल ख्रिश्चन हे दोघं पहिल्यांदाच बंगळुरुकडून खेळत आहेत. यापूर्वी मॅक्सवेल दिल्ली, पंजाब आणि मुंबई संघातून खेळला आहे. तर मुंबई इंडियन्सने मार्को जानसेन आणि ख्रिस लिन यांना संघात स्थान दिले आहे.  मागच्या पर्वात ख्रिस लिन संघाचा भाग होता. मात्र त्याला ११ खेळाडुंमध्ये संघात स्थान मिळालं नव्हतं.

IPL 2021 : धोनी ब्रिगेड ‘फास्ट ट्रॅक’वर! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ जलदगती गोलंदाज ताफ्यात दाखल!

मुंबई आणि बंगळुरू आतापर्यंत 29 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 19 सामने मुंबईने, तर 10 सामने बंगळुरूने जिंकले आहेत. मुंबईचा संघ यंदाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. मुंबईने आतापर्यंत पाचवेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केला आहे. तर, 2019 आणि 2020 या दोन वर्षात त्यांनी लागोपाठ विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे विजेतेपदाची हॅटट्र्कि साधण्याचे लक्ष समोर ठेऊन ते आयपीएलच्या मोहिमेला प्रारंभ करतील.

दुसरीकडे, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हा हंगाम आपल्या नावावर करण्यासाठी धडपड करताना दिसणार आहे. गेल्या 8 हंगामात मुंबईला पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2012मध्ये त्यांनी चेन्नईविरुद्ध अखेरची विजयी सलामी मिळवली होती. तर, मागील 13 हंगामापासून बंगळुरूला चेपॉक स्टेडियमवर एकही लढत जिंकता आलेली नाही. 2008मध्ये पहिल्या हंगामातच त्यांनी येथे अखेरचा विजय मिळवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 9:15 pm

Web Title: mi vs rcb 5 players play first time in 11 players squad rmt 84
टॅग : Ipl,Rcb
Next Stories
1 अबब! मुंबई इंडियन्सचा 6 फूट 8 इंचाचा क्रिकेटपटू तुम्हाला माहीत आहे का?
2 MI vs RCB : सलामीच्या सामन्यात बंगळुरूची मुंबईवर 2 गड्यांनी मात
3 IPL 2021 : RCBविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईला धक्का, ‘स्टार’ खेळाडू संघाबाहेर
Just Now!
X