‘‘फॉम्र्युला-वन शर्यतीचा स्वीकार जगभरात सर्वात आधी झाला असला तरी मोटरसायकल शर्यतीला (ड्रॅग रेसिंग) हा जगभरात सर्वाधिक खेळला जाणारा खेळ आह़े  भारतातही फॉम्र्युला-वनपेक्षा मोटरसायकल शर्यतीला उज्ज्वल भवितव्य आह़े,’’ असे मत आठ वेळा युरोपियन मोटरसायकल शर्यतीचे जेतेपद पटकावणाऱ्या इयान किंग यांनी मांडल़े   
‘गल्फ ऑइल’तर्फे आयोजित कार्यक्रमासाठी किंग मुंबईत दाखल झाले होत़े  या वेळी विश्व इंडय़ुरन्स अजिंक्यपद पटकावणाऱ्या अ‍ॅस्टन मार्टिन संघाचा चालक डॅरेन टर्नर याला गौरविण्यात आल़े  किंग म्हणाले, ‘‘मलाही फॉम्र्युला-वन   पाहायला आवडते, मात्र हा पैसेवाल्यांचा खेळ आह़े’’
भारतात वर्षांअखेरीस ‘इंडय़ुरन्स शर्यत’?
‘‘मोटर शर्यतीला चालना देण्यासाठी भारतातील मोटार बनविणाऱ्या व्यावसायिकांशी चर्चा सुरू असून २०१५च्या अखेरीस इंडय़ुरन्स शर्यतीचे (मोटारींच्या उपकरणाचा टिकाऊपणा आणि चालकांची चिकाटी पाहणारी शर्यत)  आयोजन करण्याचा विचार आहे,’’ अशी माहिती गोल्फ ऑइल लुब्रिकंटचे व्यवस्थापकीय संचालक रवी चावला यांनी दिली़  

kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!
novak djokovic
जोकोविचकडून फेडररचा विक्रम मोडीत; क्रमवारीत अग्रस्थानी राहिलेला सर्वात वयस्क टेनिसपटू
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा