News Flash

तो मदत करतो पण पूर्णपणे नाही, धोनीबद्दल असं का बोलला असेल ऋषभ पंत?? जाणून घ्या…

धोनी माझा सर्वात आवडता साथीदार - पंत

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपूष्टात आलं. या स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीची संथ फलंदाजी हा चर्चेचा विषय ठरला होता. या स्पर्धेनंतर एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. मात्र आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा ऋषभ पंतला उचलता आला नाही. यष्टींमागची ढिसाळ कामगिरी आणि बेजबाबदार फलंदाजी यामुळे सोशल मीडियावर पंतला सतत चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मात्र पंतसाठी धोनी हा आपल्या एका मार्गदर्शकासारखा आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर बोलत असताना पंतने धोनीबद्दलच्या आपल्या भावना बोलून दाखवल्या. पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं प्रतिनिधीत्व करतो.

“मैदानावर आणि मैदानाबाहेर धोनी माझ्यासाठी मार्गदर्शकासारखा आहे. मला कोणताही प्रॉब्लेम आला तर मी त्याच्याशी बोलतो, पण तो कधीही मला पूर्णपणे मदत करत नाही. मी त्याच्यावप पूर्णपणे अवलंबून राहू नये यासाठी तो असं करतो. माझा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तो मला युक्त्या सांगतो. फलंदाजीदरम्यान तो माझा सर्वात आवडता साथीदार आहे. ज्यावेळी तो मैदानात असतो त्यावेळी तुम्ही निश्चींत असता. त्याच्या डोक्यात कल्पना तयार असते आणि तुम्हाला फक्त त्याप्रमाणे वागायचं असतं.” पंत इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर बोलत होता.

ऋषभ पंतची खराब कामगिरी पाहता काही महिन्यांपूर्वी घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाने वृद्धीमान साहाला पसंती दिली होती. याचसोबत नवीन वर्षात न्यूझीलंड दौऱ्यातही लोकेश राहुलने टी-२० आणि वन-डे मालिकेत यष्टीरक्षण केलं होतं. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत पंतने भारतीय संघात पुनरागमन केलं खरं, मात्र इकडेही त्याला म्हणावी तशी कामगिरी करुन दाखवता आलेली नाही.

अवश्य पाहा – टीम इंडियाचे भोपळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 2:36 pm

Web Title: ms dhoni always there to help but doesnt offer complete solutions says rishabh pant psd 91
Next Stories
1 सट्टेबाजीसाठी शाकीबशी संपर्क साधणाऱ्या संघ मालकावर ICC कडून बंदी
2 “बुमराह अजूनही ‘बच्चा’ आहे” म्हणणारा पाकिस्तानी क्रिकेटर आता म्हणतो…
3 लॉकडाउन स्पेशल… रोहितने भन्नाट कमेंट करत युवराजला केलं ट्रोल
Just Now!
X